S M L

ठाण्यात बँकेच्या वसुली एजंटांनी वृद्धेला कोंडले

19 ऑक्टोबर, मुंबईकर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या बँकेच्या कर्मचा•यांनी एका वृद्ध महिलेला कोंडून ठेवल्याची घटना ठाण्यात घडली. साहेबराव देशमुख बँकेच्या कर्मचा•यांनी तब्बल 20 तास या महिलेला घरात कोंडून ठेवलं. ठाण्यातल्या पातलीपाडा परिसरात रश्मी गोळे आणि राजेंद्र गोळे यांचा बंगला आहे. त्यांच्यावर 10 लाख 21 हजार रुपयांचं कर्ज आहे. त्याची परतफेड झाली नसल्यानं साहेबराव देशमुख बँकेनं बंगल्यावर जप्तीची नोटीस बजावली. बँकेचे कर्मचारी बंगला सील करायला गेले. त्यावेळी घरातले सर्वजण बाहेर गेले होते. फक्त रश्मी यांच्या वृद्ध आई घरात झोपलेल्या होत्या. त्यांना घरात ठेवूनच बँकेच्या कर्मचा•यांनी बंगला सील केला. तब्बल 20 तास त्या घरातच बंदिस्त होत्या. याप्रकरणी कासारवाडी पोलिसांनी बँकेच्या कर्मचा•यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2008 09:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2008 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close