S M L

राज, उद्धव एकत्र यावेत

17 मेराज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर विरोधी पक्षांची ताकद वाढेल, असे मत आता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी काही जुने शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते सरसावले आहेत. मुंबईतील सतीश वळंजू आणि त्यांच्या सहा मित्रांनी 'माझी चळवळ मी महाराष्ट्राचा' अशा नावाने ही मनोमिलनाची मोहीमही सुरू केली आहे. सहा ते आठ महिने ही मोहिम सुरू राहाणार असून या मोहिमेंतर्गत सुरूवातीला एसएमएसव्दारे चळवळीचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. त्यानंतर या मोहिमेची माहिती देणारी एक वेबसाईटही तयार करून मेलव्दारे लोकांची मते मागवण्यात येणार आहेत. मोहिमेच्या शेवटी एक पब्लिक रॅली काढण्यात येणार आहे. हा उद्देश दोन्ही पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचावा असा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्यातच आता मुंडे यांनी उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्याने ही एकत्रीकरणाची चर्चो जोरात सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 10:25 AM IST

राज, उद्धव एकत्र यावेत

17 मे

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर विरोधी पक्षांची ताकद वाढेल, असे मत आता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी काही जुने शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते सरसावले आहेत. मुंबईतील सतीश वळंजू आणि त्यांच्या सहा मित्रांनी 'माझी चळवळ मी महाराष्ट्राचा' अशा नावाने ही मनोमिलनाची मोहीमही सुरू केली आहे.

सहा ते आठ महिने ही मोहिम सुरू राहाणार असून या मोहिमेंतर्गत सुरूवातीला एसएमएसव्दारे चळवळीचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. त्यानंतर या मोहिमेची माहिती देणारी एक वेबसाईटही तयार करून मेलव्दारे लोकांची मते मागवण्यात येणार आहेत.

मोहिमेच्या शेवटी एक पब्लिक रॅली काढण्यात येणार आहे. हा उद्देश दोन्ही पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचावा असा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.

त्यातच आता मुंडे यांनी उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्याने ही एकत्रीकरणाची चर्चो जोरात सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close