S M L

मोदी सरकार नरमलं, 5 हजारांपर्यंतची मर्यादा घेतली मागे

Sachin Salve | Updated On: Dec 21, 2016 05:30 PM IST

Rs-500-and-Rs-1000-Main-Article-1-121 डिसेंबर : रोज या ना त्या नव्या घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने जनतेच्या रेट्यापुढे माघार घेतलीये.  जुन्या नोटातील पाच हजार रूपयांपर्यंतच रक्कम जमा करण्याची मर्यादा आरबीआयनं उठवलीय. त्याबाबतची अधिसुचना मागे घेण्यात आलीय. त्यामुळे केवायसी खातेदारांना मोठा दिलासा मिळालाय.

सरकारच्या आधीच्या नियमानुसार 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकेत स्वीकारल्या जाणार होत्या. ती मर्यादा कमी करत सरकारनं नियम बदलला आणि जुन्या नोटांच्या स्वरूपातली फक्त पाच हजार रूपयांपर्यंतचीच रक्कम भरता येईल असा फतवा काढला. त्यावर सोशल मीडियासह सर्वच स्तरातून विरोध केला गेला. खुद्द भाजपातल्या काही नेत्यांनीही सरकारच्या ह्या तुघलकी फतव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज शेवटी आरबीआयनं पाच हजारापर्यंतची मर्यादा शिथिल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2016 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close