S M L

पैसे काढण्यावरची बंधनं कायम राहण्याची शक्यता

Sonali Deshpande | Updated On: Dec 26, 2016 09:29 AM IST

पैसे काढण्यावरची बंधनं कायम राहण्याची शक्यता

 

26 डिसेंबर : बँक शाखा आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील बंधनं ३० डिसेंबरनंतरही सुरूच राहू शकतात. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर पैसे काढण्यावर टाकण्यात आलेल्या मर्यादेची मुदत ३०डिसेंबर रोजी संपत आहे. मात्र, अजूनही बँकांना पुरेसा चलनपुरवठा होत नाहीय. दुसरीकडे मागणीच्या प्रमाणात चलनाची छपाई पण होत नसल्याने बँक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्यावरील बंधने तूर्त कायम राहावीत, असं बँकांचं मत आहे.

या परिस्थितीत तरी ही बंधनं कायम राहण्याची शक्यता आहे. आरबीआय, केंद्र सरकारने बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावर टाकण्यात आलेली मर्यादा ३० डिसेंबरपर्यंत राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल, असं सांगितलं होतं.त्यामुळे आता बँकांनी केलेल्या मागणीबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान पंतप्रधानांनी उद्या अर्थतज्ज्ञांची बैठक बोलावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close