S M L

बागवेंची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

18 मेपुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पासपोर्ट ऑफिसला खोटी माहिती दिल्याचा दावा गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केला आहे. बागवे यांच्यावर 19 केसेस असल्याचे पत्र सत्यपाल सिंग यांनी पासपोर्ट ऑफिसला दिले आहे. त्याबाबत बागवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर खुलासा केला आहे. 8 फेब्रुवारी 2010 ला पासपोर्ट ऑफिसला जे पत्र पाठवण्यात आले, त्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे- बागवेंवरील केसेस - येरवडा पोलीस स्टेशनमधील 1, फरासखाना येथील 1, डेक्कन येथील 2, स्वारगेट येथील 1, खडक पोलीस स्टेशन मधील 13 आणि कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथील 1 अशा 19 केसेस. बागवेंची बाजू - यापैकी येरवडा, स्वारगेट आणि डेक्कन या पोलीस स्टेशनच्या केसेस पेडिंग आहेत. तर फरासखाना पोलीस स्टेशनची केस कोर्टाने 98 सालीच डिसमिस केली आहे. डेक्कन पोलिस स्टेशनची एक केस कोर्टानेच काढून टाकली आहे.खडक पोलिस स्टेशनच्या केस क्रमांक 16/1986 ,159/1982 यातून बागवे यांची सुटका करण्यात आली आहे. तर 16/1986 हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. केस क्रमांक 60/1986, 115/1986 यामधून बागवे यांना निर्दोष सोडले आहे. तर केस क्रमांक 228/1989मध्ये केस सीआरपीसी नुसार कोर्टाने नोंदली नसल्याचे म्हटलं आहे. 42/1992 ही केस डिस्चार्ज करण्यात आली आहे. तर 175/1971 या केस मध्ये कॉम्प्रमाईज झाले आहे . 800/ 1973 या केसमध्ये आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र रेकॉर्ड डिस्ट्रॉय झाल्याचे म्हटले आहे. तर खडक पोलिस स्टेशनच्याच एनसी 405/81,194/87, 1398/86 या तीन केसेस या एनसी म्हणून नोंदवल्या आहेत. तरी त्याची माहिती पासपोर्ट ऑफिसला कळवण्यात आली आहे. त्याशिवाय कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये केस क्रमांक 82/ 2001 नुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. मात्र त्या केसमध्ये रमेश बागवे हे 18 आरोपींच्या यादीत नाहीत, असे पत्र अहमदनगर पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. याशिवाय या केस मध्ये जे 363 कलम लावण्यात आले नव्हते ते यात नोंदवून त्याची माहिती पासपोर्ट ऑफिसला देण्यात आली आहे. त्यामागे सत्यपालसिंग यांचेच कारस्थान असल्याचे रमेश बागवे यांनी मुख्यमंत्र्याना सांगितले आहे. बागवे यांच्यावर ज्या 3 केसेस पेंडिंग आहेत त्या राजकीय स्वरूपाच्या असल्याचा दावा बागवे यांनी मुख्यमंत्र्याकडे केला आहे. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शन यांच्या विरोधातील घेराव आहे. भाजपचे पूर्वीचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचे प्रकरण गाजले होते, तेंव्हा त्याविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली होती. आणि तिसरी केस सोनिया गांधी यांच्या विरोधात विदेशी नागरित्वाच्या मुद्याच्या निमित्ताने भाजपने जे राजकारण सुरू केले होते, त्याविरोधात डेक्कनला झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची केस असल्याचे बागवे यांनी मुख्यमंत्र्याना खुलासेवार सांगितल्याचे समजते. सत्यपाल सिंग यांच्या आदेशानेच बागवे यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती . अशा आशयाचे पत्र पुण्याच्या विशेष शाखेने 11 फेब्रुवारी 2010 ला पाठवले होते. तसेच बागवे यांच्या एस्कॉर्टचे कर्मचारी पायलट वाहनातच बसतील, असेही पत्र देण्यात आले होते. ही सगळी माहिती बागवे यांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडली. त्यामुळे आता सत्यपाल सिंग यांच्या एकूण कामाबाबतची माहिती स्वत: मुख्यमंत्री घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2010 01:53 PM IST

बागवेंची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

18 मे

पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पासपोर्ट ऑफिसला खोटी माहिती दिल्याचा दावा गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केला आहे.

बागवे यांच्यावर 19 केसेस असल्याचे पत्र सत्यपाल सिंग यांनी पासपोर्ट ऑफिसला दिले आहे. त्याबाबत बागवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर खुलासा केला आहे.

8 फेब्रुवारी 2010 ला पासपोर्ट ऑफिसला जे पत्र पाठवण्यात आले, त्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे-

बागवेंवरील केसेस - येरवडा पोलीस स्टेशनमधील 1, फरासखाना येथील 1, डेक्कन येथील 2, स्वारगेट येथील 1, खडक पोलीस स्टेशन मधील 13 आणि कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथील 1 अशा 19 केसेस.

बागवेंची बाजू - यापैकी येरवडा, स्वारगेट आणि डेक्कन या पोलीस स्टेशनच्या केसेस पेडिंग आहेत. तर फरासखाना पोलीस स्टेशनची केस कोर्टाने 98 सालीच डिसमिस केली आहे. डेक्कन पोलिस स्टेशनची एक केस कोर्टानेच काढून टाकली आहे.

खडक पोलिस स्टेशनच्या केस क्रमांक 16/1986 ,159/1982 यातून बागवे यांची सुटका करण्यात आली आहे. तर 16/1986 हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. केस क्रमांक 60/1986, 115/1986 यामधून बागवे यांना निर्दोष सोडले आहे. तर केस क्रमांक 228/1989मध्ये केस सीआरपीसी नुसार कोर्टाने नोंदली नसल्याचे म्हटलं आहे.

42/1992 ही केस डिस्चार्ज करण्यात आली आहे. तर 175/1971 या केस मध्ये कॉम्प्रमाईज झाले आहे . 800/ 1973 या केसमध्ये आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र रेकॉर्ड डिस्ट्रॉय झाल्याचे म्हटले आहे. तर खडक पोलिस स्टेशनच्याच एनसी 405/81,194/87, 1398/86 या तीन केसेस या एनसी म्हणून नोंदवल्या आहेत. तरी त्याची माहिती पासपोर्ट ऑफिसला कळवण्यात आली आहे.

त्याशिवाय कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये केस क्रमांक 82/ 2001 नुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. मात्र त्या केसमध्ये रमेश बागवे हे 18 आरोपींच्या यादीत नाहीत, असे पत्र अहमदनगर पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. याशिवाय या केस मध्ये जे 363 कलम लावण्यात आले नव्हते ते यात नोंदवून त्याची माहिती पासपोर्ट ऑफिसला देण्यात आली आहे. त्यामागे सत्यपालसिंग यांचेच कारस्थान असल्याचे रमेश बागवे यांनी मुख्यमंत्र्याना सांगितले आहे.

बागवे यांच्यावर ज्या 3 केसेस पेंडिंग आहेत त्या राजकीय स्वरूपाच्या असल्याचा दावा बागवे यांनी मुख्यमंत्र्याकडे केला आहे. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शन यांच्या विरोधातील घेराव आहे. भाजपचे पूर्वीचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचे प्रकरण गाजले होते, तेंव्हा त्याविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली होती. आणि तिसरी केस सोनिया गांधी यांच्या विरोधात विदेशी नागरित्वाच्या मुद्याच्या निमित्ताने भाजपने जे राजकारण सुरू केले होते, त्याविरोधात डेक्कनला झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची केस असल्याचे बागवे यांनी मुख्यमंत्र्याना खुलासेवार सांगितल्याचे समजते.

सत्यपाल सिंग यांच्या आदेशानेच बागवे यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती . अशा आशयाचे पत्र पुण्याच्या विशेष शाखेने 11 फेब्रुवारी 2010 ला पाठवले होते. तसेच बागवे यांच्या एस्कॉर्टचे कर्मचारी पायलट वाहनातच बसतील, असेही पत्र देण्यात आले होते. ही सगळी माहिती बागवे यांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडली. त्यामुळे आता सत्यपाल सिंग यांच्या एकूण कामाबाबतची माहिती स्वत: मुख्यमंत्री घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2010 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close