S M L

मोदींचा 'भीम'टोला, इंटरनेट शिवाय चालणार अॅप

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2016 07:35 PM IST

bhim_App30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लकी ग्राहक योजना आणि डिजीधन योजनेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 'भीम' या सरकारनं तयार केलेल्या नव्या अॅपला लाँच करण्यात आलं. हे अॅप इंटरनेट शिवाय चालणार आहे. यासाठी फक्त तुमचा अंगठाच तुमची ओळख असणार आहे.

दिल्लीत झालेल्या डिजि-धन मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी पंतप्रधानांनी नीती आयोगानं जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेच्या लाभार्थींचीही घोषणा केली.डिजीटल व्यवहार करणाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आलीय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची देशाच्या आर्थिक नितीमध्ये मोठं योगदान असून त्यांच्याच नावावरून या अॅपचं नाव ठेवण्यात आलंय. डिजीटल हेच देशाच्या प्रगतीचं माध्यम आहे असं पंतप्रधान म्हणाले. तसंच भीम अॅपच्या अवतीभोवतीच संपूर्ण अर्थव्यवस्था असणार आहे. या अॅपने तुम्हाला सर्व व्यवहार करता येणार आहे. यासाठी तुमचा अंगठाच तुमची ओळख असणार आहे.

लकी ग्राहक योजना आणि डिजीधन योजनेच्या अंतर्गत 100 दिवसांमध्ये लाखो कुटुंबाना भेट वस्तू मिळणार आहे. पुढील वर्षी 14 एप्रिलला डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मेगा ड्रॅा काढण्यात येईल ज्यामध्ये कोट्यवधीचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2016 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close