S M L

भारतीय रेल्वे अपघातात नंबर वन

शोएब अहमद, दिल्ली19 मेजगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारतीय रेल्वेचा नंबर लागतो. पण फक्त लांबीच्या दृष्टीनेच नाही, तर अपघातांच्या दृष्टीनेही. 2009 मध्ये भारतीय रेल्वेचे 177 अपघात झाले. पण तरीही रेल्वेने यातून काहीही धडा घेतलेला नाही. भारतात धावणार्‍या एकूण लोको इंजिनपैकी 250 च्या वर इंजिने धोकादायक आहेत. अशी माहिती रेल्वेच्याच एका सुरक्षेसंदर्भातील गुप्त रिपोर्टमध्ये मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत भारतीय रेल्वेच्या अपघातांची सरासरी 200च्या वर आहे. पण आश्चर्यकारक म्हणजे रेल्वेकडे असणार्‍या 250 पेक्षा जास्त इंजिनामधून गाडी चालवणार्‍या ड्रायव्हरला समोरचा सिग्नलही दिसत नाही.अमेरिकेतून आयात केलेल्या WDP4 इंजिनाचा वेग प्रतितास असतो, 160 किमी. हे देशातील सगळ्यात जास्त वेगवान इंजिन राजधानी एक्सप्रेससारख्या सुपरफास्ट गाड्यांसाठी वापरले जात. पण या इंजिनापासून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.जेव्हा हे रेल्वे इंजिन ट्रेनच्या मागच्या बाजूला असते, तेव्हा ड्रायव्हर रेल्वे रुळ बघू शकतो. पण ज्या वेळेला तेच इंजिन पुढच्या बाजूला जोडले जाते, तेव्हा मात्र इंजिनाच्या बाजूच्या भागामुळे ड्रायव्हरला पुढचे काहीही दिसत नाही. आणि त्यामुळेच अपघातांना सामोरे जावे लागते. शिवाय ड्रायव्हरला आपल्या सीटवरून पुढचे रेल्वे रुळ नीट दिसत नाहीत. 2007 मध्ये पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने सिग्नल जम्प केला. पण त्याने गाडी थांबवेपर्यंत अपघात झाला. नंतर रेल्वे प्रशासनाने पुष्पक एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर चालवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कारणांमध्ये हा अपघात हेही एक कारण सांगितले गेले आहे. कॅगच्या रिपोर्टनुसार अमेरिकेहून आयात केलेल्या या इंजिन्समध्ये काही त्रुटी आहेत. अशा प्रकारचे इंजिन हे नॉर्थ अमेरिकन रेल्वे सिस्टीमसाठी बनवण्यात आली आहेत. भारतीय सिस्टीममध्ये ते टिकाव धरु शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची किंमत. ती आहे, तब्बल 390 कोटी रुपये.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 02:57 PM IST

भारतीय रेल्वे अपघातात नंबर वन

शोएब अहमद, दिल्ली

19 मे

जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारतीय रेल्वेचा नंबर लागतो. पण फक्त लांबीच्या दृष्टीनेच नाही, तर अपघातांच्या दृष्टीनेही. 2009 मध्ये भारतीय रेल्वेचे 177 अपघात झाले. पण तरीही रेल्वेने यातून काहीही धडा घेतलेला नाही. भारतात धावणार्‍या एकूण लोको इंजिनपैकी 250 च्या वर इंजिने धोकादायक आहेत. अशी माहिती रेल्वेच्याच एका सुरक्षेसंदर्भातील गुप्त रिपोर्टमध्ये मिळाली आहे.

गेल्या पाच वर्षांत भारतीय रेल्वेच्या अपघातांची सरासरी 200च्या वर आहे. पण आश्चर्यकारक म्हणजे रेल्वेकडे असणार्‍या 250 पेक्षा जास्त इंजिनामधून गाडी चालवणार्‍या ड्रायव्हरला समोरचा सिग्नलही दिसत नाही.

अमेरिकेतून आयात केलेल्या WDP4 इंजिनाचा वेग प्रतितास असतो, 160 किमी. हे देशातील सगळ्यात जास्त वेगवान इंजिन राजधानी एक्सप्रेससारख्या सुपरफास्ट गाड्यांसाठी वापरले जात. पण या इंजिनापासून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

जेव्हा हे रेल्वे इंजिन ट्रेनच्या मागच्या बाजूला असते, तेव्हा ड्रायव्हर रेल्वे रुळ बघू शकतो. पण ज्या वेळेला तेच इंजिन पुढच्या बाजूला जोडले जाते, तेव्हा मात्र इंजिनाच्या बाजूच्या भागामुळे ड्रायव्हरला पुढचे काहीही दिसत नाही. आणि त्यामुळेच अपघातांना सामोरे जावे लागते.

शिवाय ड्रायव्हरला आपल्या सीटवरून पुढचे रेल्वे रुळ नीट दिसत नाहीत.

2007 मध्ये पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने सिग्नल जम्प केला. पण त्याने गाडी थांबवेपर्यंत अपघात झाला. नंतर रेल्वे प्रशासनाने पुष्पक एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर चालवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कारणांमध्ये हा अपघात हेही एक कारण सांगितले गेले आहे.

कॅगच्या रिपोर्टनुसार अमेरिकेहून आयात केलेल्या या इंजिन्समध्ये काही त्रुटी आहेत. अशा प्रकारचे इंजिन हे नॉर्थ अमेरिकन रेल्वे सिस्टीमसाठी बनवण्यात आली आहेत. भारतीय सिस्टीममध्ये ते टिकाव धरु शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची किंमत. ती आहे, तब्बल 390 कोटी रुपये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close