S M L

अखिलेश यादव मुलायम सिंह यादव यांच्या भेटीला

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2016 01:25 PM IST

अखिलेश यादव मुलायम सिंह यादव यांच्या भेटीला

31 डिसेंबर : समाजवादी पक्षातील नाट्याला नवं वळण मिळालंय. सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांची भेट घेण्यासाठी अखिलेश यादव त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. तिथे त्यांच्यात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे.

काल शुक्रवारी अखिलेश यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आज त्यांनी आपल्या लखनौतील निवासस्थानी आमदरांची बैठक बोलावली होती. त्याचवेळी मुलायम यांनीही त्यांच्या निवासस्थानी आमदारांना बैठकीसाठी बोलावलं होतं. मात्र, अखिलेश यांच्याकडे आमदारांचा ओढा पहाता नक्की काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं.

दरम्यान, मुलायम यांनी अखिलेश यांना फोन करून आपल्याला भेटायला यायला सांगितल्याने ते त्यांच्या निवासस्थानी रवाना झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2016 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close