S M L

'लैला'चा जोर मंदावला

20 मेलैला वादळाचा जोर आता काहिसा मंदावला आहे. मछलीपट्टणम किनार्‍यापासून 70 किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या लैला वादळामुळे आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 48 तासांत तीन राज्यांत मुसळधार पावसामुळे 17 बळी गेले आहेत. पुढील तीन दिवसही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्रातील रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या 100 ते 115 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. समुद्रकिनार्‍याजवळच्या जवळपास 40 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. हैदराबाद ते विशाखापट्टणम आणि राजमुंद्री या मार्गावरची विमाने रद्द करण्यात आली आहेत. आंध्रसोबतच पश्चिम बंगाललाही लैला वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ओरिसा आणि प. बंगाल सरकारला वादळासंदर्भात इशारा दिलाय.किनारपट्टीवरील लोक सुरक्षित किनारपट्टीवर राहणार्‍या लोकांना तात्पुरत्या उभारलेल्या कॅम्पमध्ये हलवण्यात येत आहे. आंध्र प्रदेशात 40 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांना सगळ्यात आधी स्थलांतरित करण्यात येत आहे. मच्छलीपट्टणममध्ये अशा प्रकारचे सात कॅम्प उभे केले आहेत.वादळ मछलीपट्टण्णमकडे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर लैला वादळाचा तडाखा बसेल असा अंदाज होता. पण आता हे वादळ आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीच्या मछलीपट्टण्णम वर धडकेल. त्याचा जोर आता कमी झाला असला, तरी पुढच्या प्रवासात ते विशाखापट्टणमकडे सरकेल, असा अंदाज आहे. तिथून ते ओरिसा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. ओरिसातून लैला पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन राज्यांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 09:49 AM IST

'लैला'चा जोर मंदावला

20 मे

लैला वादळाचा जोर आता काहिसा मंदावला आहे. मछलीपट्टणम किनार्‍यापासून 70 किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या लैला वादळामुळे आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या 48 तासांत तीन राज्यांत मुसळधार पावसामुळे 17 बळी गेले आहेत. पुढील तीन दिवसही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्रातील रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

सध्या 100 ते 115 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. समुद्रकिनार्‍याजवळच्या जवळपास 40 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. हैदराबाद ते विशाखापट्टणम आणि राजमुंद्री या मार्गावरची विमाने रद्द करण्यात आली आहेत.

आंध्रसोबतच पश्चिम बंगाललाही लैला वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. ओरिसा आणि प. बंगाल सरकारला वादळासंदर्भात इशारा दिलाय.

किनारपट्टीवरील लोक सुरक्षित

किनारपट्टीवर राहणार्‍या लोकांना तात्पुरत्या उभारलेल्या कॅम्पमध्ये हलवण्यात येत आहे. आंध्र प्रदेशात 40 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांना सगळ्यात आधी स्थलांतरित करण्यात येत आहे. मच्छलीपट्टणममध्ये अशा प्रकारचे सात कॅम्प उभे केले आहेत.

वादळ मछलीपट्टण्णमकडे

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर लैला वादळाचा तडाखा बसेल असा अंदाज होता. पण आता हे वादळ आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीच्या मछलीपट्टण्णम वर धडकेल. त्याचा जोर आता कमी झाला असला, तरी पुढच्या प्रवासात ते विशाखापट्टणमकडे सरकेल, असा अंदाज आहे.

तिथून ते ओरिसा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. ओरिसातून लैला पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन राज्यांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close