S M L

राठोडला 25 रोजी शिक्षा

20 मे रुचिका गिर्‍होत्राच्या आत्महत्येप्रकरणी माजी पोलिस महासंचालक राठोडला आता 25 मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. चंदिगड जिल्हा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 21 ऑगस्ट 2009 ला सीबीआय कोर्टाने रुचिका प्रकरणात राठोडला दोषी ठरवले होते. गेली 20 वर्षे हा खटला प्रलंबित आहे. डीजीपी एसपीएस राठोडने 12 ऑगस्ट 1990 ला रुचिकाचे लैंगिक शोषण केले होते. पण राठोडविरुद्धची सगळी कारवाई त्याने आपल्या अधिकारक्षेत्रात दडपल्यानंतर, 1993 मध्ये रुचिकाने आत्महत्त्या केली. यासंदर्भातल्या खटल्यात अखेर 21 ऑगस्ट 2009 ला सीबीआय न्यायालयाने राठोडला दोषी ठरवत केवळ सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा दिली. मात्र याविरोधात रुचिकाचे कुटुंबीय वरच्या कोर्टात गेले. 8 फेब्रुवारीलाच राठोडला शिक्षा जाहीर होणार होती. पण विशेष कोर्टाच्या आवारातच राठोडवर हल्ला झाल्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आणि आता आज यावर सुनावणी होणार होती. पण तीही पुढे ढकलण्यात आली आहे. एक नजर टाकूयात घटनाक्रमावर...12 ऑगस्ट 1990 : तत्कालीन आयजी एसपीएस राठोडने आपल्या ऑफिसमध्येच रुचिकाचं लैंगिक शोषण केले3 सप्टेंबर 1990 : चौकशी अहवालानंतर राठोडवर आरोप ठेवण्यात आले 20 सप्टेंबर 1990 : बेशिस्त वर्तणुकीच्या कारणावरून रुचिकाला शाळेतून काढून टाकण्यात आले23 ऑक्टोबर 1993 : चोरीच्या आरोपांखाली रुचिकाच्या भावाला आशूला अटक करण्यात आली28 डिसेंबर 1993 : रुचिका गिर्‍होत्राने विष पिऊन आत्महत्या केलीनोव्हेंबर 1994 : राठोडला बढती देण्यात आली. चौकशी अहवालावरून त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही21 ऑगस्ट 1998 : रुचिका आत्महत्येप्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले17 नोव्हेंबर 2000 : एसपीएस राठोडविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले21 डिसेंबर 2009 : सीबीआय ट्रायल कोर्टाने राठोडला रुचिकाच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवले. त्याला 6 महिन्याची शिक्षा आणि 1 हजार रु. दंड ठोठावण्यात आला. 29 डिसेंबर 2009 : रुचिकाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये फेरफार केला आणि रुचिकाच्या भावाचा छळ केला, या आरोपांखाली राठोडविरोधात 2 नवीन एफआयआर दाखल करण्यात आल्या.29 डिसेंबर 2009 : राठोडला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी कऱणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.31 डिसेंबर 2009 : आशूने गिर्‍होत्राने रुचिकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार राठोडविरोधात नोंदवली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 10:08 AM IST

राठोडला 25 रोजी शिक्षा

20 मे

रुचिका गिर्‍होत्राच्या आत्महत्येप्रकरणी माजी पोलिस महासंचालक राठोडला आता 25 मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

चंदिगड जिल्हा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 21 ऑगस्ट 2009 ला सीबीआय कोर्टाने रुचिका प्रकरणात राठोडला दोषी ठरवले होते.

गेली 20 वर्षे हा खटला प्रलंबित आहे. डीजीपी एसपीएस राठोडने 12 ऑगस्ट 1990 ला रुचिकाचे लैंगिक शोषण केले होते. पण राठोडविरुद्धची सगळी कारवाई त्याने आपल्या अधिकारक्षेत्रात दडपल्यानंतर, 1993 मध्ये रुचिकाने आत्महत्त्या केली.

यासंदर्भातल्या खटल्यात अखेर 21 ऑगस्ट 2009 ला सीबीआय न्यायालयाने राठोडला दोषी ठरवत केवळ सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा दिली. मात्र याविरोधात रुचिकाचे कुटुंबीय वरच्या कोर्टात गेले.

8 फेब्रुवारीलाच राठोडला शिक्षा जाहीर होणार होती. पण विशेष कोर्टाच्या आवारातच राठोडवर हल्ला झाल्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आणि आता आज यावर सुनावणी होणार होती. पण तीही पुढे ढकलण्यात आली आहे.

एक नजर टाकूयात घटनाक्रमावर...

12 ऑगस्ट 1990 : तत्कालीन आयजी एसपीएस राठोडने आपल्या ऑफिसमध्येच रुचिकाचं लैंगिक शोषण केले

3 सप्टेंबर 1990 : चौकशी अहवालानंतर राठोडवर आरोप ठेवण्यात आले

20 सप्टेंबर 1990 : बेशिस्त वर्तणुकीच्या कारणावरून रुचिकाला शाळेतून काढून टाकण्यात आले

23 ऑक्टोबर 1993 : चोरीच्या आरोपांखाली रुचिकाच्या भावाला आशूला अटक करण्यात आली

28 डिसेंबर 1993 : रुचिका गिर्‍होत्राने विष पिऊन आत्महत्या केली

नोव्हेंबर 1994 : राठोडला बढती देण्यात आली. चौकशी अहवालावरून त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही

21 ऑगस्ट 1998 : रुचिका आत्महत्येप्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले

17 नोव्हेंबर 2000 : एसपीएस राठोडविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले

21 डिसेंबर 2009 : सीबीआय ट्रायल कोर्टाने राठोडला रुचिकाच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवले. त्याला 6 महिन्याची शिक्षा आणि 1 हजार रु. दंड ठोठावण्यात आला.

29 डिसेंबर 2009 : रुचिकाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये फेरफार केला आणि रुचिकाच्या भावाचा छळ केला, या आरोपांखाली राठोडविरोधात 2 नवीन एफआयआर दाखल करण्यात आल्या.

29 डिसेंबर 2009 : राठोडला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी कऱणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.

31 डिसेंबर 2009 : आशूने गिर्‍होत्राने रुचिकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार राठोडविरोधात नोंदवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close