S M L

नाट्य संमेलन अध्यक्षपदी कामत

20 मे या महिन्याअखेरीस अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये रंगणार्‍या विश्‍व मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी ही घोषणा केली. या घोषणेमुळे गेले महिनाभर सुरू असलेल्या अध्यक्षपदावरून वादालादेखील पूर्णविराम मिळाला. रामदास कामत हे गेल्या वर्षी बीडमध्ये झालेल्या 89 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. अमेरिकेत होणार्‍या या नाट्यसंमेलनासाठी मोहन वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पण त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे अध्यक्ष कोण होणार यावरून वाद सुरू झाला होता. विश्वास मेहेंदळे यांच्या नावाला विरोध करत नाट्यनिर्माता संघाने संमेलनावर बहिष्काराचा इशाराही दिला होता. अखेर कोणतेही वाद न होता सुरळीतपणे संमेलन पार पडावे, यासाठी गेल्या वर्षीचे अध्यक्ष रामदास कामत यांनाच अध्यक्षपदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात विश्वास मेहेंदळे यांची जी बदनामी झाली त्याबद्दल आपण जाहीर माफी मागत असल्याचेही मोहन जोशी म्हणाले.अमेरिकेतील हे संमेलन मोहन वाघ यांना समर्पित असेल असेही आज मोहन जोशी यांनी सांगितले. पहिल्यांदाच हे नाट्यसंमेलन परदेशामध्ये रंगणार आहे. 29 मे ते 31 मे दरम्यान रंगणार्‍या या संमेलनात आशुतोष गोवारीकर, उर्मिला मातोंडकर हे प्रमुख अतिथी असणार आहेत. तर माधुरी दीक्षितसुध्दा या संमेलनाला उपस्थित राहील, अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 03:06 PM IST

नाट्य संमेलन अध्यक्षपदी कामत

20 मे

या महिन्याअखेरीस अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये रंगणार्‍या विश्‍व मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांची निवड झाली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी ही घोषणा केली. या घोषणेमुळे गेले महिनाभर सुरू असलेल्या अध्यक्षपदावरून वादालादेखील पूर्णविराम मिळाला.

रामदास कामत हे गेल्या वर्षी बीडमध्ये झालेल्या 89 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. अमेरिकेत होणार्‍या या नाट्यसंमेलनासाठी मोहन वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पण त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे अध्यक्ष कोण होणार यावरून वाद सुरू झाला होता.

विश्वास मेहेंदळे यांच्या नावाला विरोध करत नाट्यनिर्माता संघाने संमेलनावर बहिष्काराचा इशाराही दिला होता. अखेर कोणतेही वाद न होता सुरळीतपणे संमेलन पार पडावे, यासाठी गेल्या वर्षीचे अध्यक्ष रामदास कामत यांनाच अध्यक्षपदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणात विश्वास मेहेंदळे यांची जी बदनामी झाली त्याबद्दल आपण जाहीर माफी मागत असल्याचेही मोहन जोशी म्हणाले.

अमेरिकेतील हे संमेलन मोहन वाघ यांना समर्पित असेल असेही आज मोहन जोशी यांनी सांगितले. पहिल्यांदाच हे नाट्यसंमेलन परदेशामध्ये रंगणार आहे.

29 मे ते 31 मे दरम्यान रंगणार्‍या या संमेलनात आशुतोष गोवारीकर, उर्मिला मातोंडकर हे प्रमुख अतिथी असणार आहेत. तर माधुरी दीक्षितसुध्दा या संमेलनाला उपस्थित राहील, अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close