S M L

लता मंगेशकरांना शिकवणारी शाळा जमीनदोस्त

21 मेगानसम्राज्ञी लता मंगेशकर सांगलीत ज्या शाळेत शिकल्या, ती महापालिकेची मुलींची शाळा क्रमांक - 11 जमीनदोस्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेची जागा बोगस ठराव करून खासगी विकासकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील यांच्यासह या बोगस ठरावाचे अनुमोदक, सूचक आणि तत्कालीन महापौर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. मुलींची ही शाळा 1918 पासून सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि त्यांच्या भगिनी मीना मंगेशकर यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 12:50 PM IST

लता मंगेशकरांना शिकवणारी शाळा जमीनदोस्त

21 मे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर सांगलीत ज्या शाळेत शिकल्या, ती महापालिकेची मुलींची शाळा क्रमांक - 11 जमीनदोस्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शाळेची जागा बोगस ठराव करून खासगी विकासकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील यांच्यासह या बोगस ठरावाचे अनुमोदक, सूचक आणि तत्कालीन महापौर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

मुलींची ही शाळा 1918 पासून सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि त्यांच्या भगिनी मीना मंगेशकर यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close