S M L

अब्दुल समदला पोलीस कोठडी

25 मेपुणे स्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल समद याला कोर्टाने 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी हव्या असलेल्या अब्दुल समद भटकळला मुंबई एटीएस पथकाने काल मंगलोर विमानतळावर अटक केली. तो इंडियन मुजाहिदीनचा सदस्य आहे. भटकळ दुबईहून मंगलोरला येत होता. जर्मन बेकरी प्रकरणातील प्रमुख संशयीत यासिन भटकळ याचा अब्दुल हा भाऊ आहे. बेकरी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भटकळही दिसत होता, असा पोलिसांचा कयास आहे. त्याच्यावर सध्या शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा सापडला अब्दुल...जर्मन बेकरीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आढळून आले. त्या संशयितांचे फोटो देशभरातील तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांना पाठवण्यात आले. कर्नाटक पोलिसांनी त्याला ओळखले. समद यासिन भटकळचा भाऊ असल्याची ओळखही पटली. त्यानंतर तातडीने अब्दुलच्या अटकेची नोटीस काढण्यात आली. 27 फेब्रुवारीलाच अब्दुल देशाबाहेर पळाला होता. तो मंगलोरमार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली होती. केंद्रीय संस्थांनी दुबईतील ऍथोरिटीला त्याबाबत कळवले. अब्दुलला अटक करण्याआधी त्याचे फोन कॉल टॅप करण्यात आले. अब्दुलला मंगलोरहून मुंबईला आणल्यावर त्याचा ताबा महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आला. अब्दुल पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील संशयीत आरोपी आहे. त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली, असली तरी पुणे स्फोटामागील त्याची भूमिका काय आहे याचा तपास एटीएस प्रामुख्याने करणार आहे. अब्दुलच्या अटकेमुळे पुणे स्फोटाचे महत्वाचे धागेदोरे सापडणार असल्याचेबोलले जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 09:31 AM IST

अब्दुल समदला पोलीस कोठडी

25 मे

पुणे स्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल समद याला कोर्टाने 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी हव्या असलेल्या अब्दुल समद भटकळला मुंबई एटीएस पथकाने काल मंगलोर विमानतळावर अटक केली. तो इंडियन मुजाहिदीनचा सदस्य आहे. भटकळ दुबईहून मंगलोरला येत होता.

जर्मन बेकरी प्रकरणातील प्रमुख संशयीत यासिन भटकळ याचा अब्दुल हा भाऊ आहे. बेकरी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भटकळही दिसत होता, असा पोलिसांचा कयास आहे. त्याच्यावर सध्या शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा सापडला अब्दुल...

जर्मन बेकरीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आढळून आले. त्या संशयितांचे फोटो देशभरातील तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांना पाठवण्यात आले.

कर्नाटक पोलिसांनी त्याला ओळखले. समद यासिन भटकळचा भाऊ असल्याची ओळखही पटली. त्यानंतर तातडीने अब्दुलच्या अटकेची नोटीस काढण्यात आली. 27 फेब्रुवारीलाच अब्दुल देशाबाहेर पळाला होता. तो मंगलोरमार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली होती. केंद्रीय संस्थांनी दुबईतील ऍथोरिटीला त्याबाबत कळवले.

अब्दुलला अटक करण्याआधी त्याचे फोन कॉल टॅप करण्यात आले. अब्दुलला मंगलोरहून मुंबईला आणल्यावर त्याचा ताबा महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आला. अब्दुल पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील संशयीत आरोपी आहे.

त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली, असली तरी पुणे स्फोटामागील त्याची भूमिका काय आहे याचा तपास एटीएस प्रामुख्याने करणार आहे. अब्दुलच्या अटकेमुळे पुणे स्फोटाचे महत्वाचे धागेदोरे सापडणार असल्याचेबोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close