S M L

संपकरी युनियनची मान्यता रद्द

27 मेएअर इंडियाने संपकरी युनियनविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. संपकरी युनियनची मान्यता रद्द करण्यात आली आहे. युनियनच्या सर्व पदाधिकार्‍यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा युनियनने केला आहे. मंगळवारपासून संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांमुळे एअर इंडियाला अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. तसेच एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. संपकर्‍यांविरोधात कडक भूमिका स्वीकारण्याच्या सूचना कालच अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना दिल्या होत्या. कालच्या प्रशासनाच्या बैठकीनंतरही कर्मचार्‍यांनी संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण हायकोर्टाने फटकारल्यानंतर इंजीनिअर्सनी बुधवारी आपला संप मागे घेतला. याप्रकरणी 32 कर्मचार्‍यांवर बडतर्फी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 08:38 AM IST

संपकरी युनियनची मान्यता रद्द

27 मे

एअर इंडियाने संपकरी युनियनविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. संपकरी युनियनची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

युनियनच्या सर्व पदाधिकार्‍यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा युनियनने केला आहे.

मंगळवारपासून संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांमुळे एअर इंडियाला अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. तसेच एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसानही झाले.

संपकर्‍यांविरोधात कडक भूमिका स्वीकारण्याच्या सूचना कालच अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना दिल्या होत्या. कालच्या प्रशासनाच्या बैठकीनंतरही कर्मचार्‍यांनी संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

पण हायकोर्टाने फटकारल्यानंतर इंजीनिअर्सनी बुधवारी आपला संप मागे घेतला. याप्रकरणी 32 कर्मचार्‍यांवर बडतर्फी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close