S M L

शाकिबकडून फिक्सिंगविषयी खुलासा

27 मेक्रिकेटमधील मॅच फिक्सिंगचे भूत आता पुन्हा एकदा समोर आले आहे. एका वन डे मॅचमध्ये खराब कामगिरी करण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीने आपल्याशी संपर्क केला होता, असा खुलासा बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याने केला आहे. ढाका येथे मार्च 2008 मध्ये आयर्लंड विरुद्ध झालेल्या वन डे सिरीज दरम्यान ही घटना घडली असल्याचे त्याने सांगितले. एका अनोळखी व्यक्तिने आपल्याशी फोनवर संपर्क साधला आणि खराब कामगिरी करण्याची ऑफर आपल्याला दिली, असे त्याने म्हटले आहे. या प्रकारानंतर आपण बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. आणि त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तिचा आपल्याला फोन आला नसल्याचेही त्याने म्हटले आहे. या वन डे सिरीजदरम्यान शाकिब बांगलादेश टीमचा कॅप्टन नव्हता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2010 11:25 AM IST

शाकिबकडून फिक्सिंगविषयी खुलासा

27 मे

क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगचे भूत आता पुन्हा एकदा समोर आले आहे. एका वन डे मॅचमध्ये खराब कामगिरी करण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीने आपल्याशी संपर्क केला होता, असा खुलासा बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याने केला आहे.

ढाका येथे मार्च 2008 मध्ये आयर्लंड विरुद्ध झालेल्या वन डे सिरीज दरम्यान ही घटना घडली असल्याचे त्याने सांगितले.

एका अनोळखी व्यक्तिने आपल्याशी फोनवर संपर्क साधला आणि खराब कामगिरी करण्याची ऑफर आपल्याला दिली, असे त्याने म्हटले आहे.

या प्रकारानंतर आपण बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. आणि त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तिचा आपल्याला फोन आला नसल्याचेही त्याने म्हटले आहे.

या वन डे सिरीजदरम्यान शाकिब बांगलादेश टीमचा कॅप्टन नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close