S M L

डाॅ.विजय भटकर नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2017 12:32 PM IST

डाॅ.विजय भटकर नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

vijay_bhatkar3428 जानेवारी : भारताच्या परम या पहिल्या सुपर कॅाम्प्युटरची निर्मिती करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर यांची शुक्रवारी नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.

२५ जानेवारी २०१७ पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु असतील. काही दिवसांपूर्वीच सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद सोडले होते. विद्यापीठाच्या तत्कालीन हंगामी कुलगुरू व्हीसी गोपा सभरवाल यांच्या अचानकपणे करण्यात आलेल्या उचलबांगडीच्या मुद्द्यावरून नाराजी दर्शवत जॉर्ज यिओ यांनी कुलगुरूपद सोडले होते. अमेरिकेकडून भारताला सुपर काॅम्प्युटरची विक्री करण्यास नकार देण्यात आल्यानंतर भटकर यांनी परम या स्वदेशी सूपर कॅाम्प्युटरची निर्मिती केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close