S M L

सौजन्या जाधव खटल्यातील वकिलाच्या हत्येचा प्रयत्न

29 मेसौजन्या जाधव हत्या प्रकरणाची चौकशी करणारे वकील राजेश बिंद्रा यांच्या हत्येचा प्रयत्न फसला. बिंद्रा यांना गेले काही दिवस जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सौजन्या जाधव या नवी मुंबईत राहणार्‍या तरुणीने राजकीय कार्यकर्त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिची आई कोर्टात गेली होती. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर ऍडव्होकेट बिंद्रा यांनी हे प्रकरण हाताळले होते. यामुळे बिंद्रा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. यानंतर बिंद्रा आपल्या कुटुंबासह आज पुणे येथे चालले असताना, तळेगाव इथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. मागून भरधाव येणार्‍या ट्रॉलरने बिंद्रा यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात बिंद्रा आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहिले. पोलीस घटनास्थळी पोहोचलेअसून अधिक तपास सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2010 12:13 PM IST

सौजन्या जाधव खटल्यातील वकिलाच्या हत्येचा प्रयत्न

29 मे

सौजन्या जाधव हत्या प्रकरणाची चौकशी करणारे वकील राजेश बिंद्रा यांच्या हत्येचा प्रयत्न फसला. बिंद्रा यांना गेले काही दिवस जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

सौजन्या जाधव या नवी मुंबईत राहणार्‍या तरुणीने राजकीय कार्यकर्त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिची आई कोर्टात गेली होती. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते.

त्यानंतर ऍडव्होकेट बिंद्रा यांनी हे प्रकरण हाताळले होते. यामुळे बिंद्रा यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. यानंतर बिंद्रा आपल्या कुटुंबासह आज पुणे येथे चालले असताना, तळेगाव इथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. मागून भरधाव येणार्‍या ट्रॉलरने बिंद्रा यांच्या गाडीला धडक दिली.

सुदैवाने यात बिंद्रा आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहिले. पोलीस घटनास्थळी पोहोचलेअसून अधिक तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close