S M L

गोवा-पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Feb 4, 2017 01:22 PM IST

Election Maha

04 फेब्रुवारी : पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. गोव्यामध्ये सकाळी 7 वाजता तर पंजाबमध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  आपल्या मतदानाचा हक्कही बजावला.

पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाची युती लागोपाठ तिस-यांदा सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर गोव्यातही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला काँग्रेस आणि गोवा-पंजाबमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणा-या आम आदमी पार्टीकडून कडवं आव्हान दिलं जात आहे.  गोवा आणि पंजाबनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close