S M L

कोल्हापुरात गॅस्ट्रोचे पाच बळी

5 जूनकोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, राशीवडे परिसरात गॅस्ट्रोच्या साथीने पाच बळी घेतले आहेत. शेकडो लोकांना आतापर्यंत गॅस्ट्रोची लागण झाली आहे. भोगावती नदीत दूषित पाणी मिसळल्याने या भागातील कुरूकली, कोयली,राशिवडे, म्हाळुंगे, बेले या गावांतील लोकांना ही गॅस्ट्रोची लागण झाली. गेले चार दिवस या परिसरातील हॉटेल्स, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आतापर्यंत आरोग्य खात्याने छावण्या उभारून ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी केवळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळेच साथ पसरल्याचा आरोप गावकरी करत आहेत. अनेक गावची जॅकवेल्स, पाण्याच्या टाक्या या दूषित आणि गाळ साचलेल्या आहेत. या भागांतील गावांत गटारे आणि सांडपाण्याचे नियोजनच केलेले नाही. त्यामुळे पावसाळयात इथे गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 11:36 AM IST

कोल्हापुरात गॅस्ट्रोचे पाच बळी

5 जून

कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, राशीवडे परिसरात गॅस्ट्रोच्या साथीने पाच बळी घेतले आहेत.

शेकडो लोकांना आतापर्यंत गॅस्ट्रोची लागण झाली आहे. भोगावती नदीत दूषित पाणी मिसळल्याने या भागातील कुरूकली, कोयली,राशिवडे, म्हाळुंगे, बेले या गावांतील लोकांना ही गॅस्ट्रोची लागण झाली.

गेले चार दिवस या परिसरातील हॉटेल्स, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

आतापर्यंत आरोग्य खात्याने छावण्या उभारून ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी केवळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळेच साथ पसरल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

अनेक गावची जॅकवेल्स, पाण्याच्या टाक्या या दूषित आणि गाळ साचलेल्या आहेत. या भागांतील गावांत गटारे आणि सांडपाण्याचे नियोजनच केलेले नाही. त्यामुळे पावसाळयात इथे गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close