S M L

चीनचा 'चंदू चव्हाण' अखेर 54 वर्षांनंतर चीनला रवाना

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 07:35 PM IST

चीनचा 'चंदू चव्हाण' अखेर 54 वर्षांनंतर चीनला रवाना

wang qi2

11 फेब्रुवारी : चीनचा 'चंदू चव्हाण' अखेर चीनला रवाना झालाय. आपला सैनिक चंदू चव्हाण जसा चुकून पाकिस्तान हद्दीत गेलेला आणि पुन्हा त्याची सुटका झाली. तशीच काहीशी घटना एका चीनी सैनिकाची आहे. या सैनिकाचं नाव आहे वँग की...आणि हा सैनिक आपल्या देशात एक नाही दोन नाही तर तब्बल 54 वर्षे राहून गेला.

1962 च्या चीन युद्धा दरम्यान वँग की भटकत भारतात आला. त्याला भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलं. नंतर त्यांच्यावर हेरगिरीचा खटला दाखल झाला. त्यात त्याने सात वर्षाची शिक्षा भोगली. सुटकेनंतर मात्र त्याला परत चीनला जाता आलं नाही.

त्याने मध्यप्रदेशातल्या तिडोरी गावात मुक्काम ठोकला. सुशिला नावाच्या भारतीय महिलेशी विवाह केला. त्यातून त्यांना मुलंबाळं झाली. दरम्यान गेल्या काही वर्षांत त्यांनी चीनला परत जाण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात दोन्ही देशांच्या सरकारांमुळे यश आलंय.

वँग की जवळपास 54 वर्षानंतर चीनला दाखल झालेत. तिथं त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पण भारतातल्या मुलाबाळांनाही ते सोबत घेऊन जाणार का याबाबत माहिती येणं अपेक्षीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close