S M L

गोव्याचे पर्यटनमंत्री भूमिगत

तोरल वारिया, अमेय तिरोडकर, पणजी5 जूनमैत्रिणीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप असलेले गोव्याचे पर्यटन मंत्री फ्रान्सिस्को पाचेको यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नादिया टोरॅडो या त्यांच्या मैत्रिणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्यांची काल चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ते भूमिगत झाले आहेत. गोव्यातील सगळ्या पोलीस स्टेशनांना या मंत्रिमहोदयांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका अज्ञात स्थळातून त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना फॅक्सने पाठवला आहे. शुक्रवारी पाचेको यांची चौकशी सुमारे आठ तास चालली. त्यानंतर त्यांना शनिवारी सकाळी पुन्हा येण्यास सांगितले होते. पण ते गेले नाहीत. पोलिसांच्या मते नादियाला आत्महत्येला प्रवृत्त केले गेले असावे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नादियाच्या कुटुंबाने मात्र पचिकोला क्लीन चिट दिली आहे. त्यांच्या मते तिने चुकून उंदीर मारण्याचे विष प्राशन केले. कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची पचिको यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. दोन वेळा लग्न केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. आता पोलिसांना टाळल्यामुळे आणि अज्ञात ठिकाणाहून राजीनामा दिल्यामुळे पचिकोंची बाजू कमजोर झाली आहे. ते जेव्हा लोकांसमोर येतील तेव्हा त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 03:39 PM IST

गोव्याचे पर्यटनमंत्री भूमिगत

तोरल वारिया, अमेय तिरोडकर, पणजी

5 जून

मैत्रिणीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप असलेले गोव्याचे पर्यटन मंत्री फ्रान्सिस्को पाचेको यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नादिया टोरॅडो या त्यांच्या मैत्रिणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्यांची काल चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ते भूमिगत झाले आहेत.

गोव्यातील सगळ्या पोलीस स्टेशनांना या मंत्रिमहोदयांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एका अज्ञात स्थळातून त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना फॅक्सने पाठवला आहे.

शुक्रवारी पाचेको यांची चौकशी सुमारे आठ तास चालली. त्यानंतर त्यांना शनिवारी सकाळी पुन्हा येण्यास सांगितले होते. पण ते गेले नाहीत. पोलिसांच्या मते नादियाला आत्महत्येला प्रवृत्त केले गेले असावे.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नादियाच्या कुटुंबाने मात्र पचिकोला क्लीन चिट दिली आहे. त्यांच्या मते तिने चुकून उंदीर मारण्याचे विष प्राशन केले.

कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची पचिको यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. दोन वेळा लग्न केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

आता पोलिसांना टाळल्यामुळे आणि अज्ञात ठिकाणाहून राजीनामा दिल्यामुळे पचिकोंची बाजू कमजोर झाली आहे. ते जेव्हा लोकांसमोर येतील तेव्हा त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close