S M L

सचिनला विश्रांती, युवीला डच्चू

7 जूनश्रीलंकेत होणार्‍या एशिया कपसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट निवड समितीची दिल्लीत बैठक झाली. के. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पर्धेसाठी 16 खेळाडूंची टीम निवडण्यात आली. झिम्बाब्वे दौर्‍यात विश्रांती देण्यात आलेल्या सिनिअर खेळाडूंचा अपेक्षेप्रमाणे टीममध्ये समावेश झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या स्पर्धेत खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. युवराज सिंगला स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आला आहे. कॅप्टनपदाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोणीकडे सोपवण्यात आली आहे. 15 जूनपासून श्रीलंकेत एशिया कप स्पर्धेला सुरुवात होईल आणि भारताची पहिली मॅच 16 जूनला बांगलादेशविरुध्द रंगणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2010 11:52 AM IST

सचिनला विश्रांती, युवीला डच्चू

7 जून

श्रीलंकेत होणार्‍या एशिया कपसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट निवड समितीची दिल्लीत बैठक झाली.

के. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पर्धेसाठी 16 खेळाडूंची टीम निवडण्यात आली.

झिम्बाब्वे दौर्‍यात विश्रांती देण्यात आलेल्या सिनिअर खेळाडूंचा अपेक्षेप्रमाणे टीममध्ये समावेश झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या स्पर्धेत खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

युवराज सिंगला स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आला आहे.

कॅप्टनपदाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोणीकडे सोपवण्यात आली आहे.

15 जूनपासून श्रीलंकेत एशिया कप स्पर्धेला सुरुवात होईल आणि भारताची पहिली मॅच 16 जूनला बांगलादेशविरुध्द रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2010 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close