S M L

अटक करूनच दाखवा - राज ठाकरे

20 ऑक्टोबर, मुंबईरेल्वेची परीक्षा देण्यास मुंबईत आलेल्या उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या मनसे कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. दरम्यान, झारखंडमधील जमशेदपूर न्यायालयानं राज ठाकरेंविरुद्ध वाँरट बजावलं आहे. हे वाँरट जमशेदपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे सोपवलं आहे. या वाँरटबद्दल बोलताना रत्नागिरीतील जाहीर सभेत राज ठाकरे म्हणाले, सरकारनं अटक करूनच दाखवावं. मराठी माणसाच्या हक्कांसाठी मी अटक व्हायला तयार आहे '. राज ठाकरेंनी हे विधान करून राज्य सरकारला आव्हानच दिलं आहे. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांची राज्यभर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू केली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांच्यासह 5 कार्यकर्त्यांना शिवाजीपार्क पोलिसांनी अटक केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2008 12:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2008 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close