S M L

रायगडावरील धनगर होणार परागंदा

श्वेता पवार, रायगड8 जूनरायगडावर 337 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा रविवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. पण ज्यांनी शिवरायांना स्वराज्यासाठी साथ दिली...मराठ्यांच्या राज्याला उतरती कळा लागल्यानंतरही ज्यांनी शिवरायांवरील श्रद्धेपायी गड आतापर्यंत जागता ठेवला, त्या राजगडावरील धनगरांना गडावरून हुसकावून लावण्याची तयारी पुरातत्त्व खात्याने चालवली आहे. तिही ऐन पावसाळ्यात....पुरातत्व खात्याकडून या लोकांना तोंडी आदेशही देण्यात आलेत...आता पुढे काय करायचे, हाच प्रश्न या लोकांना पडला आहे.या वर्षी पुरातत्तव खात्याकडून शिवराज्यभिषेकाला बंदी घातली होती, तशीच ती किल्ल्यावर राहणार्‍या लोकांनाही घातली गेली आहे.काळानुसार किल्ल्यात बदल होत गेला. गडाची पूर्वीची शान गेली....मात्र अनेक वर्षांपासून या समाजातील काही लोक इथेच राहिले...कधी स्वराज्यासाठी लढणारे हे मावळे आता रायगडावर येणार्‍या पर्यटकांना ताक विकून उदरनिर्वाह करत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजातील लोक किल्ल्यावर राहतात. ताक, जांभळे, करवंदे विकून उदरनिर्वाह करतात. पण या वर्षी पुरात्तव खात्याकडून त्यांना गड सोडण्याचे तोंडी आदेशही देण्यात आले. त्यामुळे या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठीही पुरात्तव खात्याच्या ऑफिसमध्ये पायपीट करावी लागते.खर्‍या अर्थाने किल्ल्याची राखण करणार्‍या या मावळ्यांना आता नव्या कायद्यामुळे गड सोडण्याची वेळ आली आहे. सरकारने तर आधीच दुर्लक्ष केले आहे...आता किमान राज्यभिषेकासाठी आलेले शिवप्रेमी तरी मदतीसाठी पुढे येतील आणि सरकारदरबारी आपल्या न्यायासाठी दाद मागतील, अशी आशा त्यांना वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2010 02:35 PM IST

रायगडावरील धनगर होणार परागंदा

श्वेता पवार, रायगड

8 जून

रायगडावर 337 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा रविवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. पण ज्यांनी शिवरायांना स्वराज्यासाठी साथ दिली...मराठ्यांच्या राज्याला उतरती कळा लागल्यानंतरही ज्यांनी शिवरायांवरील श्रद्धेपायी गड आतापर्यंत जागता ठेवला, त्या राजगडावरील धनगरांना गडावरून हुसकावून लावण्याची तयारी पुरातत्त्व खात्याने चालवली आहे. तिही ऐन पावसाळ्यात....पुरातत्व खात्याकडून या लोकांना तोंडी आदेशही देण्यात आलेत...आता पुढे काय करायचे, हाच प्रश्न या लोकांना पडला आहे.

या वर्षी पुरातत्तव खात्याकडून शिवराज्यभिषेकाला बंदी घातली होती, तशीच ती किल्ल्यावर राहणार्‍या लोकांनाही घातली गेली आहे.काळानुसार किल्ल्यात बदल होत गेला. गडाची पूर्वीची शान गेली....मात्र अनेक वर्षांपासून या समाजातील काही लोक इथेच राहिले...कधी स्वराज्यासाठी लढणारे हे मावळे आता रायगडावर येणार्‍या पर्यटकांना ताक विकून उदरनिर्वाह करत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजातील लोक किल्ल्यावर राहतात. ताक, जांभळे, करवंदे विकून उदरनिर्वाह करतात. पण या वर्षी पुरात्तव खात्याकडून त्यांना गड सोडण्याचे तोंडी आदेशही देण्यात आले. त्यामुळे या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठीही पुरात्तव खात्याच्या ऑफिसमध्ये पायपीट करावी लागते.

खर्‍या अर्थाने किल्ल्याची राखण करणार्‍या या मावळ्यांना आता नव्या कायद्यामुळे गड सोडण्याची वेळ आली आहे. सरकारने तर आधीच दुर्लक्ष केले आहे...आता किमान राज्यभिषेकासाठी आलेले शिवप्रेमी तरी मदतीसाठी पुढे येतील आणि सरकारदरबारी आपल्या न्यायासाठी दाद मागतील, अशी आशा त्यांना वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2010 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close