S M L

जोहान्सबर्ग झाले फुटबॉलमय

9 जूनफूटबॉल वर्ल्डकप पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत होत आहे. आणि आता सगळ्या टीमही जोहानसबर्ग, प्रिटोरियाला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अख्खा देशच आता फूटबॉलमय झाला आहे. जोहान्सबर्गमध्ये कुठल्याही रस्त्यावर फेरफटका मारला तरी फुटबॉलवरच्या लोकांच्या प्रेमाची कल्पना येईल. जोहानसबर्गच्या प्रत्येक नाक्यावर फेरीवाले वेगवेगळ्या देशांचे झेंडे घेऊन फिरत आहेत. आणि येता-जाता गाडीवालेही आपली गाडी थांबवून त्यांच्याकडून झेंडे विकत घेत आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी हेच फेरीवाले फळे, भाज्या, मोबाईल फोनचे चार्जर किंवा आणखी काही तरी विकत होते.पण सध्या त्यांचा कधी नव्हे एवढा व्यवसाय होत आहे. कारण अर्थातच, काही दिवसांवर येऊन ठेपलेला फुटबॉल वर्ल्डकप. नितांतसुंदर खेळ अशी ख्याती असलेल्या फुटबॉलने इथे सगळ्यांनाच वेड लावले आहे. वर्ल्डकप आयोजनाचा मान दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात पडला तेव्हापासूनच अख्खा देशच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटतो आहे. स्पर्धेच्या निमित्ताने रस्ते नव्याने बांधण्यात आलेत. टेलिफोन, मोबाईल नेटवर्क अद्ययावत करण्यात आले आहे. आणि याचा फायदा वर्ल्डकप संपल्यानंतरही देशाला होणार आहे. बांधकाम क्षेत्रात झालेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आणि युरोपातील आर्थिक संकटाची झळ त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कमी प्रमाणात बसली आहे. ही स्पर्धा10 स्टेडिअममध्ये होणार आहे. फिफाने गेल्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकन फुटबॉल असोसिएशनकडून या स्टेडिअमचा ताबा घेतला आहे. फिफानेही स्टेडिअमची उभारणी आणि एकूणच वर्ल्डकपच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. फक्त ऑनलाईन तिकीट विक्रीतील त्रुटीचा फटका आफ्रिकेतीलच फुटबॉल प्रेमींना बसला आहे.आफ्रिकेतील फुटबॉल प्रेमींची आणखी ही एक आकांक्षा आहे. ती म्हणजे, फुटबॉल वर्ल्डकप आफ्रिकन टीमच्या हातात बघण्याची..ती इच्छाही पुरी झाली तर त्यांच्यासाठी स्वर्ग दोन बोटांवर असेल...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 11:34 AM IST

जोहान्सबर्ग झाले फुटबॉलमय

9 जून

फूटबॉल वर्ल्डकप पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत होत आहे. आणि आता सगळ्या टीमही जोहानसबर्ग, प्रिटोरियाला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अख्खा देशच आता फूटबॉलमय झाला आहे. जोहान्सबर्गमध्ये कुठल्याही रस्त्यावर फेरफटका मारला तरी फुटबॉलवरच्या लोकांच्या प्रेमाची कल्पना येईल.

जोहानसबर्गच्या प्रत्येक नाक्यावर फेरीवाले वेगवेगळ्या देशांचे झेंडे घेऊन फिरत आहेत. आणि येता-जाता गाडीवालेही आपली गाडी थांबवून त्यांच्याकडून झेंडे विकत घेत आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी हेच फेरीवाले फळे, भाज्या, मोबाईल फोनचे चार्जर किंवा आणखी काही तरी विकत होते.पण सध्या त्यांचा कधी नव्हे एवढा व्यवसाय होत आहे. कारण अर्थातच, काही दिवसांवर येऊन ठेपलेला फुटबॉल वर्ल्डकप. नितांतसुंदर खेळ अशी ख्याती असलेल्या फुटबॉलने इथे सगळ्यांनाच वेड लावले आहे.

वर्ल्डकप आयोजनाचा मान दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात पडला तेव्हापासूनच अख्खा देशच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटतो आहे. स्पर्धेच्या निमित्ताने रस्ते नव्याने बांधण्यात आलेत. टेलिफोन, मोबाईल नेटवर्क अद्ययावत करण्यात आले आहे. आणि याचा फायदा वर्ल्डकप संपल्यानंतरही देशाला होणार आहे.

बांधकाम क्षेत्रात झालेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आणि युरोपातील आर्थिक संकटाची झळ त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कमी प्रमाणात बसली आहे.

ही स्पर्धा10 स्टेडिअममध्ये होणार आहे. फिफाने गेल्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकन फुटबॉल असोसिएशनकडून या स्टेडिअमचा ताबा घेतला आहे. फिफानेही स्टेडिअमची उभारणी आणि एकूणच वर्ल्डकपच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. फक्त ऑनलाईन तिकीट विक्रीतील त्रुटीचा फटका आफ्रिकेतीलच फुटबॉल प्रेमींना बसला आहे.

आफ्रिकेतील फुटबॉल प्रेमींची आणखी ही एक आकांक्षा आहे. ती म्हणजे, फुटबॉल वर्ल्डकप आफ्रिकन टीमच्या हातात बघण्याची..ती इच्छाही पुरी झाली तर त्यांच्यासाठी स्वर्ग दोन बोटांवर असेल...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close