S M L

केंद्र सरकारनेच अँडरसनला सोडले

11 जूनयुनियन कार्बाईडचे प्रमुख वॉरेन अँडरसनच्या सुटकेसंदर्भात अजून खळबळजनक माहिती समोर आली आहे. 'आयबीएन नेटवर्क'ला या संदर्भात अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएची 8 डिसेंबर 1984 ची गुप्त कागदपत्रे हाती लागली आहेत. ही गुप्त कागदपत्रे अँडरसनने भोपाळ सोडण्यापूर्वीची आहेत. या कागदपत्रांनुसार केंद्र सरकारनेच अँडरसनच्या सुटकेचे आदेश दिले होते. मध्य प्रदेशमध्ये त्यावेळी निवडणुका केवळ दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या होत्या. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारला युनियन कार्बाईड कंपनीविरोधात त्वरीत कारवाई करुन निवडणुकीत राजकीय फायदा लाटायचा होता. तर दुसरीकडे केंद्रसरकारचे मात्र कंपनी प्रमुख अँडरसनला वाचवण्याकडे जास्त लक्ष होते. वायूगळती प्रकरणी यूसीआयएलला दोषी ठरवून अँडरसनच्या मूळ कंपनीकडून म्हणजे यूसीएलकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. तसेच भारतात अमेरिकन गुंतवणूक वाढावी, या उद्देशानेच अँडरसनला सोडण्यात आल्याचेही या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 11:17 AM IST

केंद्र सरकारनेच अँडरसनला सोडले

11 जून

युनियन कार्बाईडचे प्रमुख वॉरेन अँडरसनच्या सुटकेसंदर्भात अजून खळबळजनक माहिती समोर आली आहे. 'आयबीएन नेटवर्क'ला या संदर्भात अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएची 8 डिसेंबर 1984 ची गुप्त कागदपत्रे हाती लागली आहेत.

ही गुप्त कागदपत्रे अँडरसनने भोपाळ सोडण्यापूर्वीची आहेत. या कागदपत्रांनुसार केंद्र सरकारनेच अँडरसनच्या सुटकेचे आदेश दिले होते.

मध्य प्रदेशमध्ये त्यावेळी निवडणुका केवळ दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या होत्या. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारला युनियन कार्बाईड कंपनीविरोधात त्वरीत कारवाई करुन निवडणुकीत राजकीय फायदा लाटायचा होता. तर दुसरीकडे केंद्रसरकारचे मात्र कंपनी प्रमुख अँडरसनला वाचवण्याकडे जास्त लक्ष होते.

वायूगळती प्रकरणी यूसीआयएलला दोषी ठरवून अँडरसनच्या मूळ कंपनीकडून म्हणजे यूसीएलकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता.

तसेच भारतात अमेरिकन गुंतवणूक वाढावी, या उद्देशानेच अँडरसनला सोडण्यात आल्याचेही या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close