S M L

मान्सूनने व्यापला अर्धा महाराष्ट्र

11 जूनमान्सून महाराष्ट्रात कालच दाखल झाला असला तरी आज मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला. येत्या एक-दोन दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.सध्या पावसाचा जोर कमी राहणार आहे. पण विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी माहिती वेधशाळेचे संचालक ए. बी. मुजुमदार यांनी दिली आहे. मान्सूनची प्रगती नेहमीप्रमाणेच असून येत्या तीन ते चार दिवसांत तो विदर्भातही दाखल होईल, असेही मुजुमदार यांनी म्हटले आहे. औरंगाबादमध्ये जोरदार हजेरीऔरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह आलेल्या या पहिल्या पावसात भिजत औरंगाबादकरांनी मान्सूनचे स्वागत केले. जिल्हा अणि शहरात काही ठिकाणी वार्‍यामुळे झाडे पडली. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. मुंबईत इशारामुंबईत आजच मान्सून दाखल झाला. त्याचा जोर वाढला नसला तरी पुढील दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या इशार्‍यानंतर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच या विभागातील सर्व कर्मचार्‍यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2010 01:39 PM IST

मान्सूनने व्यापला अर्धा महाराष्ट्र

11 जून

मान्सून महाराष्ट्रात कालच दाखल झाला असला तरी आज मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला.

येत्या एक-दोन दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

सध्या पावसाचा जोर कमी राहणार आहे. पण विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी माहिती वेधशाळेचे संचालक ए. बी. मुजुमदार यांनी दिली आहे.

मान्सूनची प्रगती नेहमीप्रमाणेच असून येत्या तीन ते चार दिवसांत तो विदर्भातही दाखल होईल, असेही मुजुमदार यांनी म्हटले आहे.

औरंगाबादमध्ये जोरदार हजेरी

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह आलेल्या या पहिल्या पावसात भिजत औरंगाबादकरांनी मान्सूनचे स्वागत केले.

जिल्हा अणि शहरात काही ठिकाणी वार्‍यामुळे झाडे पडली. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला.

मुंबईत इशारा

मुंबईत आजच मान्सून दाखल झाला. त्याचा जोर वाढला नसला तरी पुढील दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या इशार्‍यानंतर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच या विभागातील सर्व कर्मचार्‍यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2010 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close