S M L

डोनेशन घेतल्यास शाळांना होणार दंड

12 जून शाळेत प्रवेश देताना अव्वाच्या सव्वा डोनेशन उकळणार्‍या शाळांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे. शाळांना डोनेशन घेण्यास राज्य सरकारने प्रतिबंध केला आहे. या संदर्भातील जीआर शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. हा आदेश सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी विनाअनुदानित शाळांना लागू होणार आहे.शाळेचे प्रवेश हे निवडक विद्यार्थ्यांना न देता सर्व प्राप्त अर्जांची लॉटरी काढून देण्यात यावेत. सरकारने निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा डोनेशन घेऊन नये, असे या जीआरमध्ये म्हटले आहे. तसेच प्रवेश देताना पालकांकडून डोनेशन घेतल्याचे उघड झाल्यास संबंधित शाळेला 25 हजार रुपये किंवा डोनेशनच्या दहापट रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2010 01:54 PM IST

डोनेशन घेतल्यास शाळांना होणार दंड

12 जून

शाळेत प्रवेश देताना अव्वाच्या सव्वा डोनेशन उकळणार्‍या शाळांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे. शाळांना डोनेशन घेण्यास राज्य सरकारने प्रतिबंध केला आहे.

या संदर्भातील जीआर शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. हा आदेश सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी विनाअनुदानित शाळांना लागू होणार आहे.

शाळेचे प्रवेश हे निवडक विद्यार्थ्यांना न देता सर्व प्राप्त अर्जांची लॉटरी काढून देण्यात यावेत. सरकारने निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा डोनेशन घेऊन नये, असे या जीआरमध्ये म्हटले आहे.

तसेच प्रवेश देताना पालकांकडून डोनेशन घेतल्याचे उघड झाल्यास संबंधित शाळेला 25 हजार रुपये किंवा डोनेशनच्या दहापट रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2010 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close