S M L

मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करा...

अद्वैत मेहता, पुणे14 जूनमोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करा... हा काही सुविचार नाही किंवा कोरडा उपदेश नाही. तर ज्याने स्वप्न सत्यात उतरवले त्या काश्मीरच्या पहिल्या यूपीएससी टॉपरचे अनुभवाचे हे बोल आहेत. डॉ. फैजल शाह पुणे दौर्‍यावर आला आणि सर्वप्रथम भेटला त्याच्यासारख्याच दहशतीच्या छायेत वाढलेल्या काश्मिरी मुलांना. पुण्यातील सरहद या संस्थेत ही मुले सध्या शिकत आहेत. या मुलांनी जे काही भोगले तेच कधी फैजल यांनीही भोगले होते...फैजल यांची प्रीमेडीकल टेस्ट अवघ्या 4 दिवसांवर आली असताना वडील काश्मिरी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडले. पण फैजल ध्येयापासून आजिबात विचलीत झाले नाहीत. त्यांचा निर्धार ठाम होता. संकटावर मात करत त्यांनी आपले लक्ष्य गाठले. आधी डॉक्टर आणि नंतर देशात यूपीएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवत ते आयएएस झाले. काश्मिरच्या दहशतवादाची झळ बसलेल्या या मुलांसाठी फैजल तर आदर्श होते. मग त्यांनी या मुलांना आपुलकीने यशाचा कानमंत्र दिला.फैजलशी मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर या मुलांना नवी प्रेरणा मिळाली. त्यांनाही फैजलसारखे मोठे व्हायचे आहे. देशासाठी काही तरी करायचे आहे.सरहदमुळे महाराष्ट्र आणि काश्मिरचे आगळे-वेगळे नाते निर्माण झाले आहे. दहशतवादाला बळी पडलेल्या घरातील ही मुले पुण्यात येऊन शिक्षण घेत आहेत. काश्मीरमधील वातावरण हळू-हळू बदलत आहे. अशांत आणि धगधगत्या वातावरणात राहून यूपीएससीसारखी चॅलेंजिग परीक्षा अव्वल क्रमांकाने पास होऊ शकतो. हे फैजलने सिध्द केले आहे. त्याचा आदर्श काश्मिरमधील नव्या पिढीने ठेवला, तर अनेक फैजल काश्मिरमध्ये तयार होतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2010 12:16 PM IST

मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करा...

अद्वैत मेहता, पुणे

14 जून

मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करा... हा काही सुविचार नाही किंवा कोरडा उपदेश नाही. तर ज्याने स्वप्न सत्यात उतरवले त्या काश्मीरच्या पहिल्या यूपीएससी टॉपरचे अनुभवाचे हे बोल आहेत. डॉ. फैजल शाह पुणे दौर्‍यावर आला आणि सर्वप्रथम भेटला त्याच्यासारख्याच दहशतीच्या छायेत वाढलेल्या काश्मिरी मुलांना. पुण्यातील सरहद या संस्थेत ही मुले सध्या शिकत आहेत.

या मुलांनी जे काही भोगले तेच कधी फैजल यांनीही भोगले होते...फैजल यांची प्रीमेडीकल टेस्ट अवघ्या 4 दिवसांवर आली असताना वडील काश्मिरी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडले. पण फैजल ध्येयापासून आजिबात विचलीत झाले नाहीत. त्यांचा निर्धार ठाम होता. संकटावर मात करत त्यांनी आपले लक्ष्य गाठले. आधी डॉक्टर आणि नंतर देशात यूपीएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवत ते आयएएस झाले. काश्मिरच्या दहशतवादाची झळ बसलेल्या या मुलांसाठी फैजल तर आदर्श होते. मग त्यांनी या मुलांना आपुलकीने यशाचा कानमंत्र दिला.

फैजलशी मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर या मुलांना नवी प्रेरणा मिळाली. त्यांनाही फैजलसारखे मोठे व्हायचे आहे. देशासाठी काही तरी करायचे आहे.सरहदमुळे महाराष्ट्र आणि काश्मिरचे आगळे-वेगळे नाते निर्माण झाले आहे. दहशतवादाला बळी पडलेल्या घरातील ही मुले पुण्यात येऊन शिक्षण घेत आहेत.

काश्मीरमधील वातावरण हळू-हळू बदलत आहे. अशांत आणि धगधगत्या वातावरणात राहून यूपीएससीसारखी चॅलेंजिग परीक्षा अव्वल क्रमांकाने पास होऊ शकतो. हे फैजलने सिध्द केले आहे. त्याचा आदर्श काश्मिरमधील नव्या पिढीने ठेवला, तर अनेक फैजल काश्मिरमध्ये तयार होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2010 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close