S M L

सत्ताधाऱ्यांचे विचारच चुकीचे, गुरमेहर प्रकरणी शरद पवारांचं टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2017 06:05 PM IST

Sharad pawar21302 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरमेहेर प्रकरणात भाजप सरकारवर टीका केलीय आणि गुरमेहरचं समर्थन केलंय.  ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे विचार चुकीचे आहेत, हे सगळं प्रकरण मिटवण्याऐवजी सरकार या वादात भर घालतंय, अशी टीका शरद पवारांनी केली.

दिल्ली विद्यापीठातल्या हिंसक आंदोलनानंतर गुरमेहर कौरने अभाविचा निषेध करणारं एक ट्विट केलं होतं. त्यानंतर गुरमेहरविरोधात सोशल मीडियावर मोहीमच सुरू झाली. गुरुमेहर ही देशद्रोही आहे, अशी टीका तिच्यावर झाली. एवढंच नाही तर गुरमेहरला बलात्काराच्या धमक्याही आल्या.

दिल्ली विद्यापीठात जे घडतंय त्याविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. दिल्ली विद्यापीठात एक प्रकारे दशतवादाला खतपणी घातलं जातंय, असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकाराचा निषेध केलाय.

गुरमेहर कौर प्रकरणावरून देशभरात पुन्हा एकदा राष्ट्रवादाबद्दल चर्चा सुरू झालीय.  राष्ट्रवादावर चर्चा करायची असेल तर आम्ही या चर्चेत सहभागी होऊ, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय. राष्ट्रवाद हा वाईट शब्द आहे, असा प्रचार केला जातोय. पण यात वाईट काहीही नाही, असंही ते म्हणाले. देशद्रोही आणि देशभक्त ही चर्चा आम्ही सुरू केलेली नाही, याचीही आठवण अरुण जेटलींनी करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close