S M L

मुख्यमंत्र्यांचा राणे आणि कदमांवर अविश्वास

15 जूनमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी पतंगराव कदम आणि नारायण राणे यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्री परदेशात गेले आहेत. जाताना आपल्याकडील पदभार ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपवण्याची पद्धत असते. पण चव्हाण यांनी कदम किंवा राणे यांच्याकडे तर सोपवला नाहीच, पण मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार उपमुख्यमंत्र्यांकडेही सोपवलेला नाही. शिवाजीराव मोघे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार सोपण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण, झोपडपट्टी विकास आणि शहरी विकास विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. राजेंद्र दर्डा यांच्याकडे खनिकर्म विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2010 12:21 PM IST

मुख्यमंत्र्यांचा राणे आणि कदमांवर अविश्वास

15 जून

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी पतंगराव कदम आणि नारायण राणे यांच्यावर अविश्वास दाखवला आहे.

मुख्यमंत्री परदेशात गेले आहेत. जाताना आपल्याकडील पदभार ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपवण्याची पद्धत असते. पण चव्हाण यांनी कदम किंवा राणे यांच्याकडे तर सोपवला नाहीच, पण मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार उपमुख्यमंत्र्यांकडेही सोपवलेला नाही.

शिवाजीराव मोघे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार सोपण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण, झोपडपट्टी विकास आणि शहरी विकास विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

राजेंद्र दर्डा यांच्याकडे खनिकर्म विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2010 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close