S M L

पौर्णिमा प्रभू जमीनप्रकरणी पोलिसांना नोटीस

17 जूनपुण्यातील पौर्णिमा प्रभू यांची जमीन बळकावल्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज पोलिसांवर ताशेरे ओढले. या प्रकरणी कोर्टाने राहुल येवले आणि संदीप घोरपडे या दोन पोलीस अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोघांनीही पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे. जर पुण्यात अशा घटना होऊ शकतात तर देशात इतरत्र काय होत असेल, अशी टिप्पणीही कोर्टाने केली आहे. या प्रकरणी या दोघांनाही सहआरोपी का बनवले जावू नये? असा सवालही कोर्टाने केला आहे. 29 डिंसेबर रोजी लॅन्ड माफिया दिपक मानकर याचा भाऊ शिवाजी मानकर आणि त्याच्या साथीदारांनी पौर्णिमा प्रभू यांच्या शिवाजीनगर येथील घरात घुसून तोडफोड केली होती. पौर्णिमा प्रभू याचे घर बळकावण्याचा हा प्रयत्न होता. यात पौर्णिमा यांचा भाऊ राजीव जखमी झाला होता. पोलिसांनी आरोपींना मदत केल्याचा प्रभू यांनी आरोप केला होता. पोलीस या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप प्रभू यांनी केला होता

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2010 05:43 PM IST

पौर्णिमा प्रभू जमीनप्रकरणी पोलिसांना नोटीस

17 जून

पुण्यातील पौर्णिमा प्रभू यांची जमीन बळकावल्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज पोलिसांवर ताशेरे ओढले. या प्रकरणी कोर्टाने राहुल येवले आणि संदीप घोरपडे या दोन पोलीस अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या दोघांनीही पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे. जर पुण्यात अशा घटना होऊ शकतात तर देशात इतरत्र काय होत असेल, अशी टिप्पणीही कोर्टाने केली आहे. या प्रकरणी या दोघांनाही सहआरोपी का बनवले जावू नये? असा सवालही कोर्टाने केला आहे.

29 डिंसेबर रोजी लॅन्ड माफिया दिपक मानकर याचा भाऊ शिवाजी मानकर आणि त्याच्या साथीदारांनी पौर्णिमा प्रभू यांच्या शिवाजीनगर येथील घरात घुसून तोडफोड केली होती. पौर्णिमा प्रभू याचे घर बळकावण्याचा हा प्रयत्न होता.

यात पौर्णिमा यांचा भाऊ राजीव जखमी झाला होता. पोलिसांनी आरोपींना मदत केल्याचा प्रभू यांनी आरोप केला होता. पोलीस या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप प्रभू यांनी केला होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close