S M L

'आता मी नाही, तुम्हीच मुख्यमंत्री',पार्सेकरांनी सोपवली नेमप्लेट

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2017 06:14 PM IST

'आता मी नाही, तुम्हीच मुख्यमंत्री',पार्सेकरांनी सोपवली नेमप्लेट

14 मार्च : गोव्यात अखेर पर्रिकर सरकार स्थापन झाले आहे. मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपली नेमप्लेट नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे सुपूर्द करून आता तुम्हीच मुख्यमंत्री असं म्हणत अभिनंदन केलं.

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी आज शपथ घेतली. मनोहर पर्रिकर यांनी कोंकणीतून शपथ घेतली. मनोहर पर्रिकर गोव्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेत. त्यांच्यासोबत गोव्याचे उपमुख्यमंत्री म्हणून रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनीही शपथ घेतली. सुदिन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आहेत.

मनोहर पर्रिकर यांच्यासह 10 मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. यामध्ये भाजपचे दोन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन, गोवा फॉरवर्डचे दोन आणि दोन अपक्षांचा समावेश आहे.भाजपचे फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मडकईकर यांनी शपथ घेतली. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर यांचाही समावेश करण्यात आलाय. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनीही शपथ घेतलीय. अपक्ष आमदार रोहन खवटे आणि गोविंद गावडे यांचीही मंत्रिपदी वर्णी लागलीय.

गोव्यामध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतरक नेमकी कुणाची सत्ता येणार हा प्रश्न विचारला जात होता. इथे काँग्रेस नंबर वनचा पक्ष असल्यामुळे भाजपच्या सत्तास्थापनेला काँग्रेसने आक्षेप घेतला होता. काँग्रेसने याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे भाजपच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close