S M L

बिहारमधील भाजप आघाडी धोक्यात

21 जूनभाजप आणि संयुक्त जनता दलात तणाव निर्माण झाल्याने 15 वर्षांची आघाडी धोक्यात आली आहे. याच मुद्द्यावर विचार करण्यासाठी नवी दिल्लीत भाजपची बैठक झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि व्यैंकय्या नायडू या बैठकीत होते. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी अडवाणी यांची आज भेट घेतली. आणि भाजप-जेडीयू आघाडीबाबतचा निर्णय लवकर घेण्याची विनंती केली.कोसी पूरग्रस्तांसाठी गुजरात सरकारने दिलेली 5 कोटींची मदत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतीच परत केली. त्यामुळे वाद चिघळला आहे. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांच्या मदतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता.नितीशकुमार आणि मोदी यांचे हातात हात घेतलेले फोटो प्रसिद्ध झाले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम व्होटबँकेला धक्का बसेल, अशी भिती नितीशकुमार यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी मदत परत करून भाजपला आव्हान दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2010 03:37 PM IST

बिहारमधील भाजप आघाडी धोक्यात

21 जून

भाजप आणि संयुक्त जनता दलात तणाव निर्माण झाल्याने 15 वर्षांची आघाडी धोक्यात आली आहे.

याच मुद्द्यावर विचार करण्यासाठी नवी दिल्लीत भाजपची बैठक झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि व्यैंकय्या नायडू या बैठकीत होते.

बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी अडवाणी यांची आज भेट घेतली. आणि भाजप-जेडीयू आघाडीबाबतचा निर्णय लवकर घेण्याची विनंती केली.

कोसी पूरग्रस्तांसाठी गुजरात सरकारने दिलेली 5 कोटींची मदत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतीच परत केली. त्यामुळे वाद चिघळला आहे. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांच्या मदतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता.

नितीशकुमार आणि मोदी यांचे हातात हात घेतलेले फोटो प्रसिद्ध झाले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम व्होटबँकेला धक्का बसेल, अशी भिती नितीशकुमार यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी मदत परत करून भाजपला आव्हान दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2010 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close