S M L

पाकिस्तानमध्ये बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2017 02:43 PM IST

पाकिस्तानमध्ये बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले

20 मार्च :  पाकिस्तानात बेपत्ता झालेले हजरत निजामुद्दीन दरगाहचे दोन मौलवी आज भारतात परतले. सकाळी दिल्ली विमानतळावर दोघा मौलवींचं कुटुंबियांनी जल्लोषात त्यांच स्वागत केलं आहे.

निजामुद्दीन दर्गाचे प्रमुख मौलवी सैय्यद आसिफ अली निजामी आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी हे दोघे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कराचीला गेले होते. पण, याच दरम्यान ते पाकिस्तानाच बेपत्ता झाले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानसोबत त्यांच्याविषयी चर्चा केली. त्यानंतर हे दोन्ही मौलवी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली होती.

या दोन्ही मोलवींना मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतलं होतं. ही संघटना अल्ताफ हुसैन यांची आहे. भारतातून गेलेल्या दोन्ही मौलवींचा या संघटनेशी काय संबंध आहे का याचा तपास घेण्यासाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 02:38 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close