S M L

सुप्रियांचे नागरिकत्व वादात

26 जूनराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वाचा वाद आता पुढे आला आहे.त्या भारतीय आहेत की सिंगापूरच्या नागरिक आहेत याची चौकशी तीन महिन्यांत करण्याचे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. सुळे या भारताच्या नागरिक आहेत की सिंगापूरच्या, अशी विचारणा करणारी याचिका मृणालिनी काकडे यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.मृणालिनी काकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून लढल्या होत्या. त्यांनी सुळे यांच्या नागरिकत्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला होता. मात्र मंत्रालयाकडून या संदर्भात प्रतिसाद न मिळाल्याने 2010 मध्ये त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. सिंगापूरला सुळे यांच्या नावावर जमीन आहे. आर. आर. यांचा खुलासासुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावर वाद सुरू असताना गृहमंत्री आर. आर. पाटील सुप्रिया यांच्या मदतीसाठी आज पुढे आले. सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वाबाबत कुणी संशय घेऊ नये. हे प्रकरण कोर्टात असून त्याला योग्य उत्तर देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 12:05 PM IST

सुप्रियांचे नागरिकत्व वादात

26 जून

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वाचा वाद आता पुढे आला आहे.

त्या भारतीय आहेत की सिंगापूरच्या नागरिक आहेत याची चौकशी तीन महिन्यांत करण्याचे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.

सुळे या भारताच्या नागरिक आहेत की सिंगापूरच्या, अशी विचारणा करणारी याचिका मृणालिनी काकडे यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.

मृणालिनी काकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून लढल्या होत्या. त्यांनी सुळे यांच्या नागरिकत्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला होता.

मात्र मंत्रालयाकडून या संदर्भात प्रतिसाद न मिळाल्याने 2010 मध्ये त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. सिंगापूरला सुळे यांच्या नावावर जमीन आहे.

आर. आर. यांचा खुलासा

सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावर वाद सुरू असताना गृहमंत्री आर. आर. पाटील सुप्रिया यांच्या मदतीसाठी आज पुढे आले.

सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्वाबाबत कुणी संशय घेऊ नये. हे प्रकरण कोर्टात असून त्याला योग्य उत्तर देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close