S M L

शिवाजीराव भोसले यांचे निधन

29 जूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि प्रख्यात वक्ते डॉ. शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत उद्या सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या सकाळीच अकरा वाजता फलटण या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.डॉ. भोसले यांचे वक्तृत्व आणि लेखनसंपदा प्रसिद्ध होती. मुक्तीगाथा महामानवाची, दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर खंड 1 आणि 2, कथा वक्तृत्त्वाची, प्रेरणा, हितगोष्टी, देशोदेशींचे दार्शनिक ही त्यांची साहित्यसंपदा गाजली. तसेच पुणे आकाशवाणी, वसंत व्याख्यानमाला, विवेकानंद शीला समितीच्या वतीने त्यांनी महाराष्ट्रसह परदेशातही व्याख्याने केली. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज, महायोगी अरविंद आणि समर्थ रामदास यांच्या चरित्रात्मक सीडीही प्रसिद्ध आहेत. 2009 चा राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने प्राचार्यांना गौरवण्यात आले होते. आदरांजली - गंगाधर पानतावणे - डॉ. शिवाजीराव भोसले महाराष्ट्राचे भूषण होते. महाराष्ट्रातील विचारवंतांची परंपरा त्यांनी समृद्ध केली. त्यांचे वाचन प्रचंड आणि मूलभूत होते. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या लेखणी आणि वाणीतून येत असे. शिवाजीराव म्हणजे एक निस्पृह आणि निर्लेप व्यक्तिमत्व होते. सुधीर गव्हाणे - फलटणच्या कॉलेजचे प्राचार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना ते विद्यार्थ्यांचे लाडके आणि कर्तव्यनिष्ठ हाडाचे शिक्षक होते.त्यांच्या राष्ट्रपुरुषांवरील व्याख्यानांनी युवकांचे प्रबोधन झाले. ग्रामीण भागातील एका शिक्षकाच्या कुटुंबातून आलेल्या या माणसाने आयुष्यभर समाज शिक्षकाची भूमिका बजावली. त्यांचे विचार, दृष्टी नव्या पिढीला दिशा देणारी आहे. रामराजे निंबाळकर - शिवाजीरावांच्या निधनाने फलटणचे वैभव गेले. वक्तृत्व आणि विचारांच्या खोलीवर त्यांनी फलटणचे नाव देशभर नेले. राजकारणापासून दूर राहून त्यांनी विचार आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2010 03:30 PM IST

शिवाजीराव भोसले यांचे निधन

29 जून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि प्रख्यात वक्ते डॉ. शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

त्यांचे पार्थिव पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत उद्या सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या सकाळीच अकरा वाजता फलटण या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. भोसले यांचे वक्तृत्व आणि लेखनसंपदा प्रसिद्ध होती. मुक्तीगाथा महामानवाची, दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर खंड 1 आणि 2, कथा वक्तृत्त्वाची, प्रेरणा, हितगोष्टी, देशोदेशींचे दार्शनिक ही त्यांची साहित्यसंपदा गाजली.

तसेच पुणे आकाशवाणी, वसंत व्याख्यानमाला, विवेकानंद शीला समितीच्या वतीने त्यांनी महाराष्ट्रसह परदेशातही व्याख्याने केली. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज, महायोगी अरविंद आणि समर्थ रामदास यांच्या चरित्रात्मक सीडीही प्रसिद्ध आहेत. 2009 चा राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने प्राचार्यांना गौरवण्यात आले होते.

आदरांजली -

गंगाधर पानतावणे - डॉ. शिवाजीराव भोसले महाराष्ट्राचे भूषण होते. महाराष्ट्रातील विचारवंतांची परंपरा त्यांनी समृद्ध केली. त्यांचे वाचन प्रचंड आणि मूलभूत होते. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या लेखणी आणि वाणीतून येत असे. शिवाजीराव म्हणजे एक निस्पृह आणि निर्लेप व्यक्तिमत्व होते.

सुधीर गव्हाणे - फलटणच्या कॉलेजचे प्राचार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना ते विद्यार्थ्यांचे लाडके आणि कर्तव्यनिष्ठ हाडाचे शिक्षक होते.त्यांच्या राष्ट्रपुरुषांवरील व्याख्यानांनी युवकांचे प्रबोधन झाले. ग्रामीण भागातील एका शिक्षकाच्या कुटुंबातून आलेल्या या माणसाने आयुष्यभर समाज शिक्षकाची भूमिका बजावली. त्यांचे विचार, दृष्टी नव्या पिढीला दिशा देणारी आहे.

रामराजे निंबाळकर - शिवाजीरावांच्या निधनाने फलटणचे वैभव गेले. वक्तृत्व आणि विचारांच्या खोलीवर त्यांनी फलटणचे नाव देशभर नेले. राजकारणापासून दूर राहून त्यांनी विचार आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2010 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close