S M L

छत्तीसगडमध्ये 26 जवान शहीद

29 जून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. आज नारायणपूर जिल्ह्यातील दोरई भागात सीआरपीएफच्या गाडीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जवान शहीद झाले. सीआरपीएफचे विशेष महानिदेशक विजय रमण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मृतांच्या संख्येत वाढही होऊ शकते, असे सीआरपीएफच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जगदलपूरच्या महाराणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशनहून परतणार्‍या जवानांच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. गेल्या वर्षभरामध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना कायम लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एक नजर टाकूयात गेल्या वर्षभरातील नक्षलवादी हल्ल्यांवर...13 एप्रिल 2009 : ओरिसातील कोरापट येथील हल्ल्यात 11 निमलष्करी जवान शहीद22 मे 2009 : गडचिरोलीमध्ये झालेल्या हल्ल्यात 16 पोलीस शहीद10 जून 2009 : झारखंडमधील सारंडा इथे 9 पोलीस शहीद13 जून 2009 : झारखंडमधील बोकारो इथे 10 पोलीस शहीद31 जुलै 2009 : कर्नाटकातील विजापूर इथे एक विशेष पोलीस अधिकारी शहीद8 ऑक्टोबर 2009 : गडचिरोलीमध्ये 17 पोलीस शहीद15 फेब्रुवारी 2010 : पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूरमध्ये 24 जवान शहीद4 एप्रिल 2010 : ओरिसातील कोरापट इथे 11 जवान शहीद6 एप्रिल 2010 : दंतेवाडामधील हल्ल्यात 76 जवान शहीद

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2010 03:37 PM IST

छत्तीसगडमध्ये 26 जवान शहीद

29 जून

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. आज नारायणपूर जिल्ह्यातील दोरई भागात सीआरपीएफच्या गाडीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जवान शहीद झाले.

सीआरपीएफचे विशेष महानिदेशक विजय रमण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मृतांच्या संख्येत वाढही होऊ शकते, असे सीआरपीएफच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जगदलपूरच्या महाराणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशनहून परतणार्‍या जवानांच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला.

गेल्या वर्षभरामध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना कायम लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एक नजर टाकूयात गेल्या वर्षभरातील नक्षलवादी हल्ल्यांवर...

13 एप्रिल 2009 : ओरिसातील कोरापट येथील हल्ल्यात 11 निमलष्करी जवान शहीद

22 मे 2009 : गडचिरोलीमध्ये झालेल्या हल्ल्यात 16 पोलीस शहीद

10 जून 2009 : झारखंडमधील सारंडा इथे 9 पोलीस शहीद

13 जून 2009 : झारखंडमधील बोकारो इथे 10 पोलीस शहीद

31 जुलै 2009 : कर्नाटकातील विजापूर इथे एक विशेष पोलीस अधिकारी शहीद

8 ऑक्टोबर 2009 : गडचिरोलीमध्ये 17 पोलीस शहीद

15 फेब्रुवारी 2010 : पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूरमध्ये 24 जवान शहीद

4 एप्रिल 2010 : ओरिसातील कोरापट इथे 11 जवान शहीद

6 एप्रिल 2010 : दंतेवाडामधील हल्ल्यात 76 जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2010 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close