S M L

जॉन हॉवर्ड यांचे स्वप्न भंगले

30 जूनआयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे शरद पवार उद्या म्हणजे 1 जुलै रोजी घेणार आहेत. पण उपाध्यक्षपदी उत्सुक असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचे स्वप्न मात्र भंगले आहे. सिंगापूरला झालेल्या बैठकीत काही क्रिकेट बोर्डांनी हॉवर्ड यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आयसीसी आता नवीन उपाध्यक्षाच्या शोधात आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपला नवीन उमेदवार 31 ऑगस्टपर्यंत यासाठी पाठवावा, असे आयसीसीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. उपाध्यक्षपदी नेमणूक होण्यासाठी हॉवर्ड यांना सात मतांची गरज होती. पण 10 देशांच्या बोर्डांपैकी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचाच पाठिंबा हॉवर्ड यांना मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 08:37 AM IST

जॉन हॉवर्ड यांचे स्वप्न भंगले

30 जून

आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे शरद पवार उद्या म्हणजे 1 जुलै रोजी घेणार आहेत. पण उपाध्यक्षपदी उत्सुक असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचे स्वप्न मात्र भंगले आहे.

सिंगापूरला झालेल्या बैठकीत काही क्रिकेट बोर्डांनी हॉवर्ड यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आयसीसी आता नवीन उपाध्यक्षाच्या शोधात आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपला नवीन उमेदवार 31 ऑगस्टपर्यंत यासाठी पाठवावा, असे आयसीसीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

उपाध्यक्षपदी नेमणूक होण्यासाठी हॉवर्ड यांना सात मतांची गरज होती. पण 10 देशांच्या बोर्डांपैकी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचाच पाठिंबा हॉवर्ड यांना मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close