S M L

मंत्रिमंडळ बैठकीत खडाखडी

30 जूनआज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले. कारण होते, हुसेन दलवाई यांच्या वक्तव्याचे. याबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाब विचारला. राष्ट्रवादीनेच सांगलीत दंगल घडवून आणली, असा आरोप काल हुसेन दलवाई यांनी केला होता.सुरुवातीला दोन निर्णयांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी हुसेन दलवाईंच्या वक्तव्याचा विषय काढला. पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली.काँग्रेसने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीच्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप भुजबळांनी यावेळी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उगाच 'काहीतरी बोलू नका' असे म्हटले. त्यावर भुजबळ उठून उभे राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सगळे मंत्री उभे राहिले. आता वाद नको, आपण वेगळ्या दालनात बसूया, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसचे काही मंत्री आणि राष्ट्रवादीचे मंत्री चर्चेसाठी आमने-सामने बसले. या दीड तासाच्या चर्चेत दलवाई प्रकरण, बेस्ट फाईव्ह प्रकरण, परदेश दौर्‍यावेळी सूत्रे सोपवली नव्हती, सांगली मिरज दंगली प्रकरणी कृष्णप्रकाश यांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीकडून आलेल्या फाईल्सना मुख्यमंत्र्यांकडून होत असलेला विरोध आदी गोष्टींवर चर्चा झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 10:48 AM IST

मंत्रिमंडळ बैठकीत खडाखडी

30 जून

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले. कारण होते, हुसेन दलवाई यांच्या वक्तव्याचे. याबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाब विचारला.

राष्ट्रवादीनेच सांगलीत दंगल घडवून आणली, असा आरोप काल हुसेन दलवाई यांनी केला होता.

सुरुवातीला दोन निर्णयांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी हुसेन दलवाईंच्या वक्तव्याचा विषय काढला. पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीच्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप भुजबळांनी यावेळी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उगाच 'काहीतरी बोलू नका' असे म्हटले. त्यावर भुजबळ उठून उभे राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सगळे मंत्री उभे राहिले. आता वाद नको, आपण वेगळ्या दालनात बसूया, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काँग्रेसचे काही मंत्री आणि राष्ट्रवादीचे मंत्री चर्चेसाठी आमने-सामने बसले.

या दीड तासाच्या चर्चेत दलवाई प्रकरण, बेस्ट फाईव्ह प्रकरण, परदेश दौर्‍यावेळी सूत्रे सोपवली नव्हती, सांगली मिरज दंगली प्रकरणी कृष्णप्रकाश यांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीकडून आलेल्या फाईल्सना मुख्यमंत्र्यांकडून होत असलेला विरोध आदी गोष्टींवर चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close