S M L

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

5 जुलैमहागाईविरोधात विरोधकांनी पुकारलेल्या बंदला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सगळेच व्यवहार आज ठप्प झाले. देशात ठिकठिकाणी भाजप, शिवसेना, डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. महाराष्ट्रातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. तर मुंबईत बेस्टच्या बसेस फोडण्यात आल्या. मुंबईतही शाळा कॉलेजेना सुट्टी देण्यात आली. टार्गेट बेस्टमुंबईत कुठलाही बंद किंवा आंदोलन झाले की पहिले टार्गेट असते, ते बेस्टच्या बसेस.आजही बेस्टच्या बसेसना टार्गेट करण्यात आले. पण बेस्टची सेवा मात्र सुरू आहे. सध्या बेस्टच्या 2400 बसेस रस्त्यावर धावत आहेत. दादर, लोअर परेल, वडाळा, मालाड, मालवणी, कांजूरमार्ग भागात बसेसवर दगडफेक करण्यात आली. मुंबई आतापर्यत 78 बस चे नुकसान झाले आहे. 60 बस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. ज्या पक्षाच्या कर्यकर्त्यांचा यात सहभाग असेल त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली जाईल, असे बेस्टचे ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले आहे.जोगेश्वरी इथे एका बेस्टच्या बसची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीत बसचा ड्रायव्हर जखमी झाला. तर बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोरिवलीत रेल रोकोबोरिवली रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी रेल रोको केले. भाववाढ कमी झाली पाहिजे, अशी घोषणाबाजी इथे करण्यात आली. पोलिसांनी शिवसेने्‌च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे सुरु झाल्या. दादरमधूनही शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं यांचाही समावेश आहे.मुंबईत धरपकडमुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मुंबईत 175 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर ठाण्यात 544 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले. तसेच राज्यभरातून आंदोलनाच्या म्होरक्यांना अटक करण्यात आली. बोरिवलीमध्ये विनोद घोसाळकर, मुलुंडमधून किरीट सोमैया आणि सरदार तारा सिंग तर औरंगाबादमधून आंबादास दानवे आणि प्रकाश महाजन या नेत्यांना पोलीसांनी अटक केली आहे.भारत बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. राज्यात काय काय नुकसान झाले आहे, त्यावर एक नजर टाकूयात...26 एसटी बसेसची तोडफोड307 पुरुष आणि 100 महिलांना अटक60 टक्के शाळा आणि ट्रेन बंदगडचिरोलीत एक एसटी जाळलीराज्यात बंद 60 टक्के यशस्वी झाल्याची पोलिसांची माहिती मुंडेंना अटकभारत बंदचे आंदोलन करत असताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनंगटीवार यांना अंधेरीत पोलिसांनी अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2010 08:08 AM IST

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

5 जुलै

महागाईविरोधात विरोधकांनी पुकारलेल्या बंदला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सगळेच व्यवहार आज ठप्प झाले. देशात ठिकठिकाणी भाजप, शिवसेना, डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. महाराष्ट्रातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. तर मुंबईत बेस्टच्या बसेस फोडण्यात आल्या. मुंबईतही शाळा कॉलेजेना सुट्टी देण्यात आली.

टार्गेट बेस्ट

मुंबईत कुठलाही बंद किंवा आंदोलन झाले की पहिले टार्गेट असते, ते बेस्टच्या बसेस.आजही बेस्टच्या बसेसना टार्गेट करण्यात आले. पण बेस्टची सेवा मात्र सुरू आहे. सध्या बेस्टच्या 2400 बसेस रस्त्यावर धावत आहेत. दादर, लोअर परेल, वडाळा, मालाड, मालवणी, कांजूरमार्ग भागात बसेसवर दगडफेक करण्यात आली.

मुंबई आतापर्यत 78 बस चे नुकसान झाले आहे. 60 बस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. ज्या पक्षाच्या कर्यकर्त्यांचा यात सहभाग असेल त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली जाईल, असे बेस्टचे ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले आहे.जोगेश्वरी इथे एका बेस्टच्या बसची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीत बसचा ड्रायव्हर जखमी झाला. तर बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बोरिवलीत रेल रोको

बोरिवली रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी रेल रोको केले. भाववाढ कमी झाली पाहिजे, अशी घोषणाबाजी इथे करण्यात आली. पोलिसांनी शिवसेने्‌च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे सुरु झाल्या.

दादरमधूनही शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं यांचाही समावेश आहे.मुंबईत धरपकड

मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मुंबईत 175 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर ठाण्यात 544 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले. तसेच राज्यभरातून आंदोलनाच्या म्होरक्यांना अटक करण्यात आली. बोरिवलीमध्ये विनोद घोसाळकर, मुलुंडमधून किरीट सोमैया आणि सरदार तारा सिंग तर औरंगाबादमधून आंबादास दानवे आणि प्रकाश महाजन या नेत्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

भारत बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. राज्यात काय काय नुकसान झाले आहे, त्यावर एक नजर टाकूयात...

26 एसटी बसेसची तोडफोड

307 पुरुष आणि 100 महिलांना अटक

60 टक्के शाळा आणि ट्रेन बंद

गडचिरोलीत एक एसटी जाळली

राज्यात बंद 60 टक्के यशस्वी झाल्याची पोलिसांची माहिती

मुंडेंना अटक

भारत बंदचे आंदोलन करत असताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनंगटीवार यांना अंधेरीत पोलिसांनी अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2010 08:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close