S M L

राणेंना माणिकरावांचा पाठिंबा

8 जुलैकोकण रेल्वेच्या मुद्यावरुन महसूलमंत्री नारायण राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्याच्या आंदोलनासाठी नारायण राणे कोकणाकडे रवाना झालेत. विशेष म्हणजे त्यांच्या चक्का जाम आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. राणेंनी पुकारलेले आंदोलन हे काँग्रेसचे आंदोलन नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. पण आता हे आंदोलन झाले तर काँग्रेसच्या बॅनरखालीच होणार, असे राणेंनी म्हटले आहे. तर माणिकरावांच्या पाठिंब्यामुळे राणेंची बाजू बळकट झाली आहे. मागण्यांचा विचार करण्यासाठी राणेंनी रेल्वे मंत्रालयाला आज दुपारपर्यंतची वेळ दिली आहे. सावंतवाडीतून गाडी सुरू करा, सावंतवाडी टमिर्नस करा, आणि काही ठिकाणी उड्डाणपूल झाले पाहिजेत, या मागण्यांसह राणेंनी अनेक मागण्या केल्या आहेत. रत्नागिरीतील आंदोलनाचे नेतृत्त्व खासदार नीलेश राणे करणार आहेत. तर सिंधुदुर्गातील नेतृत्त्व नारायण राणे करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 8, 2010 09:04 AM IST

राणेंना माणिकरावांचा पाठिंबा

8 जुलै

कोकण रेल्वेच्या मुद्यावरुन महसूलमंत्री नारायण राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

उद्याच्या आंदोलनासाठी नारायण राणे कोकणाकडे रवाना झालेत. विशेष म्हणजे त्यांच्या चक्का जाम आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.

राणेंनी पुकारलेले आंदोलन हे काँग्रेसचे आंदोलन नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. पण आता हे आंदोलन झाले तर काँग्रेसच्या बॅनरखालीच होणार, असे राणेंनी म्हटले आहे. तर माणिकरावांच्या पाठिंब्यामुळे राणेंची बाजू बळकट झाली आहे.

मागण्यांचा विचार करण्यासाठी राणेंनी रेल्वे मंत्रालयाला आज दुपारपर्यंतची वेळ दिली आहे. सावंतवाडीतून गाडी सुरू करा, सावंतवाडी टमिर्नस करा, आणि काही ठिकाणी उड्डाणपूल झाले पाहिजेत, या मागण्यांसह राणेंनी अनेक मागण्या केल्या आहेत.

रत्नागिरीतील आंदोलनाचे नेतृत्त्व खासदार नीलेश राणे करणार आहेत. तर सिंधुदुर्गातील नेतृत्त्व नारायण राणे करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2010 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close