S M L

बॉम्ब स्फोटात स्वयंसेवक ; संघ परिवार चिंतेत

आशिष दीक्षित, नवी दिल्ली8 जुलैअजमेर आणि हैदराबादेत झालेल्या बाँबस्फोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रचारकांना पोलिसांनी पकडल्यानंतर आता संघ परिवारात चिंतेचे वातावरण आहे. परिस्थितीचा मुकाबला नेमका कसा करायचा, यावर चर्चा करण्यासाठी संघ आणि भाजपच्या नेत्यांच्या काही गुप्त बैठका झाल्या आहेत.हिंदू दहशतवादमालेगाव बाँबस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंगला अटक झाली. आणि 'हिंदू दहशतवाद' ही नवा प्रकार समोर आला. त्यावेळी संघ आणि भाजपने साध्वी आणि इतर आरोपींशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हणत हात झटकले.मे 2007मध्ये झालेल्या अजमेर स्फोटाच्या तपासात परमानंद आणि रामजी या दोन स्वसंसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ऑक्टोबर 2007मध्ये हैदराबादेत झालेल्या मक्का मशीद स्फोटासंदर्भात अशोक वरशने आणि अशोक बेरी या संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची चौकशी करण्यात आली.या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संघात समाजकंटक प्रवृत्ती?संघात समाजकंटक प्रवृत्ती फोफावत आहेत का? आणि असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करायची? या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांत संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन बैठका झाल्या. मंगळवारी रात्री आणि बुधवारी झालेल्या या बैठकांना संघाच्या वतीने मदनदास देवी उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने अध्यक्ष नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अरूण जेटली आणि अनंत कुमार हजर होते. कारवाईचा विचार झाला तर...गृहमंत्रालयाने संघावर काही कारवाईचा विचार केला. तर भाजपने आक्रमक राजकीय भूमिका घ्यावी, असे भाजपला सांगण्यात आल्याचे समजते. दहशतवादाशी संबंध असलेल्या स्वयंसेवकांना शोधून काढून त्यांना संघापासून दूर करण्याची, तसेच पोलिसांनी पकडलेल्या स्वयंसेवकांना कुठलीही कायदेशीर मदत न करण्याची भूमिका संघाने घेतल्याचे समजते. पण या लढाईत संघाला भाजपची मदत हवी आहे. यापुढे येणार्‍या या राजकीय आणि कायदेशीर समस्यांपासून आता भाजप संघाला मदतीचा हात देणार, असेही या बैठकांमध्ये ठरले आहे. कारण दहशतवादाचा बट्टा संघाला महाग पडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 8, 2010 05:43 PM IST

बॉम्ब स्फोटात स्वयंसेवक ; संघ परिवार चिंतेत

आशिष दीक्षित, नवी दिल्ली

8 जुलै

अजमेर आणि हैदराबादेत झालेल्या बाँबस्फोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रचारकांना पोलिसांनी पकडल्यानंतर आता संघ परिवारात चिंतेचे वातावरण आहे. परिस्थितीचा मुकाबला नेमका कसा करायचा, यावर चर्चा करण्यासाठी संघ आणि भाजपच्या नेत्यांच्या काही गुप्त बैठका झाल्या आहेत.

हिंदू दहशतवाद

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंगला अटक झाली. आणि 'हिंदू दहशतवाद' ही नवा प्रकार समोर आला. त्यावेळी संघ आणि भाजपने साध्वी आणि इतर आरोपींशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हणत हात झटकले.

मे 2007मध्ये झालेल्या अजमेर स्फोटाच्या तपासात परमानंद आणि रामजी या दोन स्वसंसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ऑक्टोबर 2007मध्ये हैदराबादेत झालेल्या मक्का मशीद स्फोटासंदर्भात अशोक वरशने आणि अशोक बेरी या संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची चौकशी करण्यात आली.

या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघात समाजकंटक प्रवृत्ती?

संघात समाजकंटक प्रवृत्ती फोफावत आहेत का? आणि असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करायची? या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांत संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन बैठका झाल्या. मंगळवारी रात्री आणि बुधवारी झालेल्या या बैठकांना संघाच्या वतीने मदनदास देवी उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने अध्यक्ष नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अरूण जेटली आणि अनंत कुमार हजर होते.

कारवाईचा विचार झाला तर...

गृहमंत्रालयाने संघावर काही कारवाईचा विचार केला. तर भाजपने आक्रमक राजकीय भूमिका घ्यावी, असे भाजपला सांगण्यात आल्याचे समजते.

दहशतवादाशी संबंध असलेल्या स्वयंसेवकांना शोधून काढून त्यांना संघापासून दूर करण्याची, तसेच पोलिसांनी पकडलेल्या स्वयंसेवकांना कुठलीही कायदेशीर मदत न करण्याची भूमिका संघाने घेतल्याचे समजते. पण या लढाईत संघाला भाजपची मदत हवी आहे. यापुढे येणार्‍या या राजकीय आणि कायदेशीर समस्यांपासून आता भाजप संघाला मदतीचा हात देणार, असेही या बैठकांमध्ये ठरले आहे. कारण दहशतवादाचा बट्टा संघाला महाग पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2010 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close