S M L

शिवडीत पुन्हा गॅस गळती

15 जुलैशिवडीच्या हाजीबंदर भागात आज पुन्हा एकदा क्लोरीन वायूची गळती झाली. कालच या भागात क्लोरीनची गळती झाली होती. क्लोरीन वायूचे सिलेंडर निकामी करताना ही वायू गळती झाली.फायर ब्रिगेडचे अधिकारी सिलेंडर निकामी करत असतानाच ही घटना घडली. कालच्या घटनेतील बाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. अजूनही 46 जणांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान बॉम्बे पोर्ट ट्रस्टने गॅस गळती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राहुल अस्थाना यांनी केली. अस्थाना स्वत:च या समितीचे अध्यक्ष आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2010 01:03 PM IST

शिवडीत पुन्हा गॅस गळती

15 जुलै

शिवडीच्या हाजीबंदर भागात आज पुन्हा एकदा क्लोरीन वायूची गळती झाली. कालच या भागात क्लोरीनची गळती झाली होती. क्लोरीन वायूचे सिलेंडर निकामी करताना ही वायू गळती झाली.फायर ब्रिगेडचे अधिकारी सिलेंडर निकामी करत असतानाच ही घटना घडली.

कालच्या घटनेतील बाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. अजूनही 46 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान बॉम्बे पोर्ट ट्रस्टने गॅस गळती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राहुल अस्थाना यांनी केली. अस्थाना स्वत:च या समितीचे अध्यक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2010 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close