S M L

राज्य सरकार चंद्राबाबूंना रोखणार

19 जुलैआंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 26 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांना कोणत्या जेलमध्ये ठेवायचे, याबाबत न्यायाधीश पोलिसांशी सल्लामसलत करत आहेत. चंद्राबाबूंनी पर्सनल बाँड घ्यायला नकार दिला आहे. देतायत. त्यांना बाभळीला जाऊ दिले जाणार नाही. ते बाँड मोडून जर बाभळीला गेले तर कारवाई होईल, त्यांच्यावर कारवाई करायला आमचे पोलीस सक्षम आहेत, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे. काल झालेल्या दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर चंद्राबाबूंच्या समर्थकांकडून एकही दगड खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आर. आर. पाटील यांनी दिला आहे.सभागृहात चंद्राबाबूंचा निषेधबाभळीचा प्रश्न आज दोन्ही सभागृहात चांगला गाजला. सर्वपक्षीय आमदारांनी बाभळीप्रश्नी चंद्राबाबूंचा निषेध केला. यामुळे विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तेलंगणातील पोटनिवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चंद्राबाबू बाभळीच्या प्रश्नावर राजकीय स्टंटबाजी करत आहेत. त्यांच्यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे. आता चंद्राबाबूंनी समंजसपणा दाखवून कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी. नाही तर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.कोअर ग्रुपची बैठकदरम्यान बाभळीप्रश्नावर मंत्रिमंडळाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह आर. आर. पाटील, नारायण राणे, अजित पवार तसेच संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीत कोर्टाच्या निर्देशानुसार चंद्राबाबूंवर कारवाईची सावध भूमिका घ्यावी, यावर सर्वांचे एकमत झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2010 04:17 PM IST

राज्य सरकार चंद्राबाबूंना रोखणार

19 जुलै

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 26 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांना कोणत्या जेलमध्ये ठेवायचे, याबाबत न्यायाधीश पोलिसांशी सल्लामसलत करत आहेत. चंद्राबाबूंनी पर्सनल बाँड घ्यायला नकार दिला आहे.

देतायत. त्यांना बाभळीला जाऊ दिले जाणार नाही. ते बाँड मोडून जर बाभळीला गेले तर कारवाई होईल, त्यांच्यावर कारवाई करायला आमचे पोलीस सक्षम आहेत, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे. काल झालेल्या दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर चंद्राबाबूंच्या समर्थकांकडून एकही दगड खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आर. आर. पाटील यांनी दिला आहे.

सभागृहात चंद्राबाबूंचा निषेध

बाभळीचा प्रश्न आज दोन्ही सभागृहात चांगला गाजला. सर्वपक्षीय आमदारांनी बाभळीप्रश्नी चंद्राबाबूंचा निषेध केला. यामुळे विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तेलंगणातील पोटनिवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चंद्राबाबू बाभळीच्या प्रश्नावर राजकीय स्टंटबाजी करत आहेत. त्यांच्यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे.

आता चंद्राबाबूंनी समंजसपणा दाखवून कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी. नाही तर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

कोअर ग्रुपची बैठक

दरम्यान बाभळीप्रश्नावर मंत्रिमंडळाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह आर. आर. पाटील, नारायण राणे, अजित पवार तसेच संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीत कोर्टाच्या निर्देशानुसार चंद्राबाबूंवर कारवाईची सावध भूमिका घ्यावी, यावर सर्वांचे एकमत झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2010 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close