S M L

बांधकाम थांबवण्याचे कृषी विद्यापीठाला आदेश

22 जुलैसंशोधनासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर सुरू केलेले बांधकाम थांबवा, असा आदेश हायकोर्टाने नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाला दिला आहे.नागपूरच्या मध्यभागी असलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. बियाणांच्या संशोधनासाठी ही जमीन वापरण्यात येते. पण विद्यापीठाने या जमिनीवर इमारत बांधकाम सुरू केले होते. याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या संबंधी निर्णय देत हायकोर्टाने हे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिलेत. शहरातील मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर कमी होत चालली आहे. या विरोधात महापालिकेने या आधीच बांधकाम थांबवण्याची नोटीस कृषी विद्यापीठाला दिली होती. पण त्यालाही कृषी विद्यापीठाने आव्हान दिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 12:29 PM IST

बांधकाम थांबवण्याचे कृषी विद्यापीठाला आदेश

22 जुलै

संशोधनासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर सुरू केलेले बांधकाम थांबवा, असा आदेश हायकोर्टाने नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाला दिला आहे.

नागपूरच्या मध्यभागी असलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे. बियाणांच्या संशोधनासाठी ही जमीन वापरण्यात येते. पण विद्यापीठाने या जमिनीवर इमारत बांधकाम सुरू केले होते. याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या संबंधी निर्णय देत हायकोर्टाने हे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिलेत. शहरातील मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर कमी होत चालली आहे.

या विरोधात महापालिकेने या आधीच बांधकाम थांबवण्याची नोटीस कृषी विद्यापीठाला दिली होती. पण त्यालाही कृषी विद्यापीठाने आव्हान दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close