S M L

फलटणच्या रस्त्यांवर दुधाचे पाट

22 जुलै आयात शुल्क माफ करून परदेशातून 30 हजार टन दूध पावडर आणि 15 हजार टन तूप राज्य सरकार आयात करत आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत येणार असल्याने शेतकरी संघटना व शिवसेना आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर क़ृषीमंत्री शरद पवार यांच्या मतदार संघातील फलटण येथे स्वराज्य या खाजगी दूध संघाचे चार टँकर रस्त्यावर रिकामे करण्यात आले. एकीकडे राज्य शासन आयात करणार्‍या या दूध पावडरी वरील आयात शुल्क माफ करत आहे. तर दुसरीकडे खाजगी दूध संघांनी कालपासून शेतकर्‍यांकडील 20 टक्के दूध घेणे नाकारले आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने फलटण येथे आज चार दूध टँकरमधील दूध ओतून देण्यात आले. त्यामुळे फलटणच्या चौकांतील रस्त्यांवर दुधाचे पाट वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 03:28 PM IST

फलटणच्या रस्त्यांवर दुधाचे पाट

22 जुलै

आयात शुल्क माफ करून परदेशातून 30 हजार टन दूध पावडर आणि 15 हजार टन तूप राज्य सरकार आयात करत आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत येणार असल्याने शेतकरी संघटना व शिवसेना आक्रमक झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर क़ृषीमंत्री शरद पवार यांच्या मतदार संघातील फलटण येथे स्वराज्य या खाजगी दूध संघाचे चार टँकर रस्त्यावर रिकामे करण्यात आले.

एकीकडे राज्य शासन आयात करणार्‍या या दूध पावडरी वरील आयात शुल्क माफ करत आहे. तर दुसरीकडे खाजगी दूध संघांनी कालपासून शेतकर्‍यांकडील 20 टक्के दूध घेणे नाकारले आहे.

याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने फलटण येथे आज चार दूध टँकरमधील दूध ओतून देण्यात आले. त्यामुळे फलटणच्या चौकांतील रस्त्यांवर दुधाचे पाट वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close