S M L

राज्यभरात जोरदार पाऊस

24 जुलैराज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. महाडमध्ये दरवर्षीप्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली तर कोकणात रेल्वे स्थानकावर ट्रॅक खचल्यानं दोन दिवस बंद राहणार आहे. तर पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे.कोकण रेल्वे दोन दिवस बंद निवसर रेल्वे स्थानकाजवळ जमीन खचली आहे. हा रेल्वेट्रॅक पूर्ववत सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे कोकण रेल्वेमार्ग शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद राहणार आहे. मुंबई ते मडगावदरम्यानची रेल्वे वाहतूक 25 जुलैपर्यंत बंद राहील. कोकण रेल्वेच्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकावर ट्रॅक खचण्याची ही गेल्या दोन महिन्यातली तिसरी घटना आहे.महाडमध्ये पूर परिस्थितीमहाडमध्येसुद्धा दरवर्षीप्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. गांधारी पुलावर पाणी गेल्यामुळे काही गावांचा महाडशी संपर्क तुटला आहे. सावित्री आणि गांधारी नदी तुडुंब भरल्यामुळे प्रशासनानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापुरात पावसाची संततधार कायमकोल्हापुरात अतिवृष्टीमुळे पंधरा बंधार्‍यांवर पाणी आल्यानं जवळपास 20 गावांचा संपर्क अंशत: तुटला. जिल्ह्यातील सात मार्ग बंद झाले आहेत तर अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी गेल्या दोन दिवसांत तब्बल 11 फुटांनी वाढली. त्यामुळे आता पंचगंगेची पातळी 31 फुटांपर्यंत वाढली आहे. जिल्ह्यात चोवीस तासात 695 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपलं. जिल्ह्यातल्या भंगसाळ आणि करली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे मालवण तालुक्यातल्या काळसेबागवाडी आणि मसुरे कावावाडी या भागात पाणी भरलं आहे. प्रशासनानं या भागातल्या कुटुंबांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही स्थलांतरणाची कार्यवाही सुरू झालेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे 3 बळी तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये 10 वर्षांच्या पाचवीतल्या विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. खेड तालुक्यातल्या तुंबामध्ये पुरातून वाहून आलेल्या पुरुषाचा मृतदेह आणि संगमेश्वरमध्ये बुडून मृत झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.मुंबईत पावसाचा जोर कायम, प्रशासन सज्जपावसाचा जोर मर्यादित असल्यानं वाहतुकीवर परिणाम नाही. रेल्वे वाहतूकही सुरळीत आहे. खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनानं गाड्या धीम्या गतीनं चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लाड सबवे, मिलन सबवे, खार सबवे, प्रियदर्शनी पार्क, महेश्वरी उद्यान, लालबाग, परळ, हिंदमाता इथल्या सखल भागांत पाणी साचल्यानं ट्रॅफिक धीम्या गतीनं सुरू आहे.पुण्यात पावसाचं जोरदार पुनरागमनमहिनाभराच्या विश्रांतीनंतर पुणे परिसरात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. कधी मुसळधार,कधी रिमझिम तर कधी संततधार हजेरी लावून पावसानं पाणीकपातीनं त्रस्त असलेल्या पुणेकरांना थोडा दिलासा दिला.शनिवार-रविवारचा वीकेंड आणि बरसणारा पाऊस यामुळे पुणेकरांची पावसात भिजण्याची इच्छा पूर्ण झाली. वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जवळचं डेस्टिनेशन अर्थात खडकवासला पुणेकरांनी चांगलीच गर्दी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2010 05:04 PM IST

राज्यभरात जोरदार पाऊस

24 जुलै

राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. महाडमध्ये दरवर्षीप्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली तर कोकणात रेल्वे स्थानकावर ट्रॅक खचल्यानं दोन दिवस बंद राहणार आहे. तर पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे.

कोकण रेल्वे दोन दिवस बंद

निवसर रेल्वे स्थानकाजवळ जमीन खचली आहे. हा रेल्वेट्रॅक पूर्ववत सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे कोकण रेल्वेमार्ग शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद राहणार आहे. मुंबई ते मडगावदरम्यानची रेल्वे वाहतूक 25 जुलैपर्यंत बंद राहील. कोकण रेल्वेच्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकावर ट्रॅक खचण्याची ही गेल्या दोन महिन्यातली तिसरी घटना आहे.

महाडमध्ये पूर परिस्थिती

महाडमध्येसुद्धा दरवर्षीप्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. गांधारी पुलावर पाणी गेल्यामुळे काही गावांचा महाडशी संपर्क तुटला आहे. सावित्री आणि गांधारी नदी तुडुंब भरल्यामुळे प्रशासनानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापुरात पावसाची संततधार कायम

कोल्हापुरात अतिवृष्टीमुळे पंधरा बंधार्‍यांवर पाणी आल्यानं जवळपास 20 गावांचा संपर्क अंशत: तुटला. जिल्ह्यातील सात मार्ग बंद झाले आहेत तर अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी गेल्या दोन दिवसांत तब्बल 11 फुटांनी वाढली. त्यामुळे आता पंचगंगेची पातळी 31 फुटांपर्यंत वाढली आहे. जिल्ह्यात चोवीस तासात 695 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपलं. जिल्ह्यातल्या भंगसाळ आणि करली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे मालवण तालुक्यातल्या काळसेबागवाडी आणि मसुरे कावावाडी या भागात पाणी भरलं आहे. प्रशासनानं या भागातल्या कुटुंबांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही स्थलांतरणाची कार्यवाही सुरू झालेली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे 3 बळी

तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये 10 वर्षांच्या पाचवीतल्या विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. खेड तालुक्यातल्या तुंबामध्ये पुरातून वाहून आलेल्या पुरुषाचा मृतदेह आणि संगमेश्वरमध्ये बुडून मृत झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम, प्रशासन सज्ज

पावसाचा जोर मर्यादित असल्यानं वाहतुकीवर परिणाम नाही. रेल्वे वाहतूकही सुरळीत आहे. खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनानं गाड्या धीम्या गतीनं चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लाड सबवे, मिलन सबवे, खार सबवे, प्रियदर्शनी पार्क, महेश्वरी उद्यान, लालबाग, परळ, हिंदमाता इथल्या सखल भागांत पाणी साचल्यानं ट्रॅफिक धीम्या गतीनं सुरू आहे.

पुण्यात पावसाचं जोरदार पुनरागमन

महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुणे परिसरात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. कधी मुसळधार,कधी रिमझिम तर कधी संततधार हजेरी लावून पावसानं पाणीकपातीनं त्रस्त असलेल्या पुणेकरांना थोडा दिलासा दिला.शनिवार-रविवारचा वीकेंड आणि बरसणारा पाऊस यामुळे पुणेकरांची पावसात भिजण्याची इच्छा पूर्ण झाली. वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जवळचं डेस्टिनेशन अर्थात खडकवासला पुणेकरांनी चांगलीच गर्दी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2010 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close