S M L

कोल्हापुरात पंचगंगेची पातळी वाढली

26 जुलैसततच्या पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेने इशारा पातळी गाठली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 39 फूट 6 इंच इतकी झाली आहे. तर धोक्याची पातळी 43 फूट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर अधिकार्‍यांनी आपली हेडक्वार्टर्स सोडू नये, असा आदेश निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 149 मिमी पावसाची नोंद झालीय. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 220 मिमी पावसाची नोंद झाली. तर सर्वात कमी पाऊस शिरोळ तालुक्यात 38 मिलीमीटर पडला. जिल्ह्यातील 33 मार्ग बंद आहेत, तर 66 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत. 50 पेक्षा अधिक गावांचा अंशत: संपर्क तुटला आहे. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणातून 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 12:26 PM IST

कोल्हापुरात पंचगंगेची पातळी वाढली

26 जुलै

सततच्या पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेने इशारा पातळी गाठली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 39 फूट 6 इंच इतकी झाली आहे. तर धोक्याची पातळी 43 फूट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर अधिकार्‍यांनी आपली हेडक्वार्टर्स सोडू नये, असा आदेश निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 149 मिमी पावसाची नोंद झालीय. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 220 मिमी पावसाची नोंद झाली. तर सर्वात कमी पाऊस शिरोळ तालुक्यात 38 मिलीमीटर पडला. जिल्ह्यातील 33 मार्ग बंद आहेत, तर 66 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत. 50 पेक्षा अधिक गावांचा अंशत: संपर्क तुटला आहे.

तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणातून 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close