S M L

विलासरावही आंदोलनाच्या पावित्र्यात

27 जुलैराज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखही आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत. कारण आहे, लातूर-मुंबई एक्प्रेसचे नांदेड मुंबई एक्प्रेसमध्ये झालेले रूपांतर. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या लातूर-मुंबई एक्प्रेसचे रूपांतर एक जुलैपासून नांदेड मुंबई एक्प्रेसमध्ये झाले. त्यामुळे अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. ही एक्सप्रेस पुन्हा लातूरवरूनच सोडण्यात यावी, असे निवेदनही देशमुख यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहे. रीतसर मार्गाने ही रेल्वे पुन्हा लातूर-मुंबईच्या रूळावर आली नाही, तर आंदोलन करण्याचा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2010 12:00 PM IST

विलासरावही आंदोलनाच्या पावित्र्यात

27 जुलै

राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखही आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत.

कारण आहे, लातूर-मुंबई एक्प्रेसचे नांदेड मुंबई एक्प्रेसमध्ये झालेले रूपांतर. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या लातूर-मुंबई एक्प्रेसचे रूपांतर एक जुलैपासून नांदेड मुंबई एक्प्रेसमध्ये झाले. त्यामुळे अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे.

ही एक्सप्रेस पुन्हा लातूरवरूनच सोडण्यात यावी, असे निवेदनही देशमुख यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहे.

रीतसर मार्गाने ही रेल्वे पुन्हा लातूर-मुंबईच्या रूळावर आली नाही, तर आंदोलन करण्याचा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close